'लोकनाट्य कला केंद्रातील गोळीबार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न'

शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांचा सत्ताधारी पक्षांवर आरोप

'लोकनाट्य कला केंद्रातील गोळीबार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न'

पुणे: प्रतिनिधी 

चौफुला केडगाव परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या निकटवर्तीयांनी केलेल्या गोळीबाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सत्ता मिळालेल्या लोकांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

चौफुला केडगाव परिसरात अंबिका लोकनाट्य कला केंद्रात आलेल्या टोळक्याने त्या ठिकाणी गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. हा गोळीबार सत्तारूढ महायुती आमदाराच्या भावाच्या मित्रांनी केला असून या गोळीबारात नृत्य करणारी महिला कलावंत जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हवेत गोळीबार झाला असून कोणीही जखमी नाही. 

या प्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून संबंधित महिला कलाकार व कलाकेंद्र चालकांवर दबाव आणण्यात येत असल्याचा आरोप शिंदे आणि रोहित पवार यांनी केला आहे. जखमी झालेली महिला कलाकार आणि अन्य लोकांवर दबाव टाकला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 

हे पण वाचा  'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू'

आम्ही आपल्या पद्धतीने या प्रकरणाची माहिती घेत आहोत. आम्हाला मिळालेली माहिती योग्य पद्धतीने पोलिसांपर्यंत पोहोचवली जाईल, असे रोहित पवार यांनी सांगितले. शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर मनमानीचा आरोप केला आहे. सत्ताधाऱ्यांवर कायद्याचा धाक राहिलेला नाही. आपण काहीही करू शकतो असे त्यांना वाटते. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. त्यांच्याकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शिंदे यांनी केला. 

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना 21 तारखेच्या रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंबिका कला केंद्र येथे हवेत गोळीबार झाला. याप्रकरणी कोणीही जखमी नाही. कला केंद्र चालकांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

 

About The Author

Advertisement

Latest News

'प्रशासनाकडून होत आहे आरोपींची पाठ राखण' 'प्रशासनाकडून होत आहे आरोपींची पाठ राखण'
बीड: प्रतिनिधी  महादेव मुंडे प्रकरणा त प्रशासन सुरुवातीपासूनच निष्क्रिय राहिले असून प्रशासनाकडून आरोपींची पाठराखंड केली जात असल्याचा आरोप महादेव मुंडे...
इजा, बिजा, तिजाबद्दल कारवाई की सजा?
'भाषेवरून मारहाण करणे नाही खपवून घेतले जाणार'
तुरुंगातून सुटल्यावर मिरवणूक काढणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड
'... तर काय भोक पडणार आहेत का?'
डेंग्यूबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून जनजागृती
'महायुतीला कमीपणा येऊ देणार नाही'

Advt