दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा करणार मित्र पक्षांना खुश
राष्ट्रीय लोकशाही आघाडी लढविणार एकत्रितपणे निवडणूक
नवी दिल्ली: प्रतिनिधी
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धूळ चारण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांना खुश करण्याचे धोरण भारतीय जनता पक्षाने आखले आहे. त्यानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही निवडणूक एकत्रितपणे लढणार असून भाजपकडून इतर मित्र पक्षांना जागा सोडल्या जाणार आहेत.
या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. संयुक्त जनता दल, जनशक्ती पक्ष आणि जीनत राम मांझी यांचा हम पक्ष या भाजपाच्या मित्र पक्षांनी या निवडणुकीत जागांची मागणी केली आहे. त्यानुसार भाजप या निवडणुकीत मित्र पक्षांना जागा सोडणार आहे. त्याचप्रमाणे प्रचारातही मित्र पक्षांच्या मोठ्या नेत्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
या प्रचार मोहिमेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री जीनत राम मांझी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा अशा मित्र पक्षाच्या नेत्यांना प्रचार मोहिमेत सामावून घेण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभेच्या तब्बल 20 मतदारसंघात पूर्वांचलमधून आलेल्या मतदारांचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे मराठी आणि दाक्षणात्य मतदारांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी प्रचारात या नेत्यांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे.
Comment List