मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २२, २३ आणि २४ जानेवारीला तीन तासांचा ब्लॉक

मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वरसोली टोल नाका दरम्यान वळविण्यात येणार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २२, २३ आणि २४ जानेवारीला तीन तासांचा ब्लॉक

वडगाव मावळ प्रतिनिधी 

 पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे डोंगरगाव – कुसगाव येथे मुंबई लेनवर पुलाचे गर्डर बसवण्याचे काम २२ ते २४ जानेवारी दरम्यान केले जाणार आहे. या कामासाठी हे तीन दिवस दुपारी १२ ते ३ या कालावधीत एक्सप्रेस वे वर ब्लॉक  घेतला जाणार असल्याची माहिती  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत देण्यात आली.

२२, २३ आणि २४ जानेवारी रोजी एक्सप्रेस वे वरील वाहतूक दुपारी १२ ते ३ या कालावधीत पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी ३ वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे.असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले

ज्य रस्ते विकास महामंडळातर्फे द्रुतगती मार्गावर सातत्याने वेगवेगळी कामे केली जात आहेत. मागील काही कालावधीत सूचना फलक, गॅन्ट्री बसविण्याचे तसेच सीसीटीव्ही बसविण्याचे काम करण्यात आले. आता कुसगाव येथे उड्डाणपुलाचे काम केले जात आहे. त्यासाठी ब्लॉक  घेण्यात येणार आहे.

हे पण वाचा  'हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी काढण्याची चाचपणी'

द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्ष (9822498224) अथवा महामार्ग पोलिसांना (9833498334) संपर्क कारण्याचे आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी केले आहे

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

Advt