तिसऱ्या भाषेसाठी कला, शारीरिक शिक्षण आणि कलेच्या वेळेत घट

'आनंददायी शनिवार'च्या माध्यमातून कसर भरून काढण्याचे सरकारचे आश्वासन

तिसऱ्या भाषेसाठी कला, शारीरिक शिक्षण आणि कलेच्या वेळेत घट

मुंबई: प्रतिनिधी

नव्या शैक्षणिक धोरणानुसार तिसऱ्या भाषेचा अट्टाहास सरकारने कायम ठेवला असून त्यासाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर पाडणाऱ्या कला, शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव या विषयांसाठी दिल्या जाणाऱ्या वेळेत घट केली आहे. मात्र, ही कसर 'आनंददायी शनिवार' या उपक्रमातून भरून काढली जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. 

विरोधी राजकीय पक्षांसह शिक्षक, पालक आणि शिक्षण तज्ज्ञांचा विरोध डावलून राज्य सरकारने तीन भाषांचे धोरण पुढे रेटण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या भाषेसाठी वेळापत्रकात बदल करून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या विषयांच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. 

हे शैक्षणिक वर्ष 16 जून पासून सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) इयत्ता पहिलीच्या तासिकांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. आतापर्यंत कलाशिक्षणासाठी आठवड्यात 60 मिनिटांच्या चार तासिका वेळापत्रकात समाविष्ट होत्या. त्याचप्रमाणे शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव या विषयांसाठी आठवड्यात 45 तासांच्या प्रत्येकी दोन तासिका यांचा समावेश होता. 

हे पण वाचा  सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?

नव्या वेळापत्रकात तासिकांची संख्या कायम ठेवण्यात आली असली तरी देखील कला शिक्षणाची तासिका 60 मिनिटांनी ऐवजी 35 मिनिटांची तर शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव या विषयांची तासिका 45 मिनिटांना ऐवजी 35 मिनिटांची असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. 

मात्र, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आनंददायी ठरावे याचे सर्व प्रयत्न शासनाकडून केले जात असल्याचा दावा दादा भुसे यांनी केला. कला आणि क्रीडा याचा समावेश असलेल्या 'आनंददायी शनिवार' हा उपक्रम राबविला जाणार असून त्यातून विद्यार्थ्यांना भरपूर आनंद आणि वेगवेगळे कलाप्रकार आणि क्रीडा प्रकार शिकायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी संमेलने, सहली यांच्या आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण हे आनंददायीच वाटेल, असा दावा त्यांनी केला. 

About The Author

Advertisement

Latest News

सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव? सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?
सातारा, प्रतिनिधि  सातारा शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलात किमान पहिल्या टप्प्यात ४००० नव्या...
मन की बात" मध्ये जुन्नरच्या रमेश खरमाळे यांच्या कामाचा गौरव
कळंब येथे आंबेडकर स्मारक उभारणार - गौतम खरात  
भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!
चाकण औद्योगिक परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री यांना निवेदन!
शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

Advt