रिपब्लिकन युवा मोर्चा घालणार विधान भवनला घेराव

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप

रिपब्लिकन युवा मोर्चा घालणार विधान भवनला घेराव

पुणे: प्रतिनिधी 

एरंडवणे भीमनगर वस्ती येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली झोपडपट्टी धारकांची  फसवणूक होत असल्याचा आरोप करून रिपब्लिकन युवा मोर्चाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.  संघटनेच्या वतीने 12 जुलै रोजी विधान भवनाला घेराव घातला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

भीमनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रद्द करावा, सर्व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवताना स्थानिकांच्या संमतीचे प्रमाण 50 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत वाढवावे, झोपडपट्टीधारकांची फसवणूक करणाऱ्या विकासकावर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, झोपडपट्टी धारकांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला साथ देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात होणाऱ्या फसवणुकीच्या तक्रारींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावा, या कक्षाच्या त्रैमासिक बैठका घेऊन झोपडवासी यांचे प्रश्न मार्गी लागावे, अशा रिपब्लिकन युवा मोर्चाच्या मागण्या असल्याचे डंबाळे यांनी सांगितले आहे. 

एसआरए संघर्ष समितीचे देविदास ओहाळ आणि जावेद शेख हे या आंदोलनाचे संयोजक असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे पण वाचा  डॉ. प्रल्हाद खंदारे यांचा हक्काच्या घरासाठी २० वर्ष संघर्ष

About The Author

Advertisement

Latest News

Advt