- राज्य
- ... म्हणून एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात'
... म्हणून एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात'
काँग्रेस प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी उडवली खिल्ली
पुणे: प्रतिनिधी
शिंदेंसेनेचे’ प्रायोजक संस्थापक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असल्याने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ''जय गुजरात’ म्हणणे भाग पडते, अशा शब्दात काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. शिंदेसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व आता उपमुख्यमंत्री पदावर बसवणाऱ्याअमित शहांची तळी ऊचलणे व मर्जी सांभाळणे हे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आद्य कर्तव्य असल्याने त्यांनी 'जय गुजरात’ म्हणणे अपेक्षेला धरून होते, असेही तिवारी म्हणाले.
भाजपच्या कुशीत शिंदे सेनेचा जन्म
महाराष्ट्रद्रोही भाजप नेत्यांनी’ 'महामहीम शहेनशहांचे' नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्रतील संविधानिक सरकार राजकीय घरफोडीने, रात्री अपरात्री वेषांतरे करून पाडले व शिवसेना नेत्यांचे अपहरण करून सुरत - गुहावटी मार्गे प्रवासात भाजपच्या कुशीत शिंदे सेनेचा जन्म झाला.
शिंदेसेनेतर्फे निलेश राणे, शायना एनसी या भाजप नेत्यांना विधानसभेची उमेदवारी दिली गेली, तेंव्हाच हे स्पष्ट झाले होते की, ‘शिंदेसेनेचा रिमोट कंट्रोल’ ही भाजप नेत्यांकडे आहे, अशी टीका तिवारी यांनी केली.
राज्यात शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार असतांनाच 'महामहीम गुजरात नरेश' यांनी, राज्यातील तरुणांचे रोजगार, ऊद्योग व केंद्रीय संस्था या महाराष्ट्रातून गुजरातला नेण्याचा पराक्रम केला हे ईतिहास कधीही विसरणार नसल्याचे प्रतिपादन तिवारी यांनी केले.