माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे निधन

गंगापूर तालुक्यात शोककळा

माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे निधन

गंगापूर: प्रतिनिधी

सरपंच पदापासून राज्यमंत्री पदापर्यंत यशस्वी राजकीय वाटचाल करणारे माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. गंगापूर तालुक्याच्या विकासात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार ते राज्यमंत्री असा डोणगावकर यांचा कार्यक्षम राजकीय प्रवास होता. गंगापूर तालुक्याला विकसित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. भगीरथी शिक्षण संस्था व मुक्तेश्वर शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि भूविकास बँक यांचे ते संचालक होते. मराठवाड्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला. 

शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण पाटील डोणगावकर यांचे ते पिता होत. मागील आठ वर्ष डोणगावकर यांनी दुर्धर आजाराशी लढा दिला. 

हे पण वाचा  रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

About The Author

Advertisement

Latest News

Advt