'हेमंत पाटील हे अण्णा हजारे यांचे खरे वारसदार'
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वनारसे यांचे मत
पुणे: प्रतिनिधी
भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील धडाडीचे कार्यकर्ते आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे संस्थापक अध्यक्ष हेमंत पाटील हेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील खरे वारसदार आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वनारसे यांनी व्यक्त केले.
हेमंत पाटील हे भ्रष्टाचार समूळ उखडून काढण्यासाठी तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. मुंबईपासून दिल्लीपर्यंत त्यांनी कडवा संघर्ष केला आहे. त्याचप्रमाणे धनगर आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या समस्यांच्या निवारणासाठी देखील पाटील यांनी भरीव कार्य केले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी त्यांनी वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे, असेही वनारसे यांनी सांगितले. पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्यावर जबाबदारीचे पद सोपवावे. त्यामुळे समाजाचे भरे होण्यास मदत होणार आहे, अशी मागणी देखील वनारसे यांनी केली.
अण्णांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने ...
प्रत्यक्ष राजकारणात न जाता समाज सेवा करण्याच्या किंवा अन्य काही ध्येयधोरणांच्या बाबतीत अण्णा हजारे यांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका, असे सुचविणारे पत्र पाटील यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना दिले होते. मात्र, अण्णांच्या संध्याकाळी दुर्लक्ष केल्यानेच केजरीवाल यांची आज दुरवस्था झाली असल्याचे, वनारसे यांनी सांगितले. एक चांगला नेता असून देखील काही निर्णय व धोरणे चुकल्यामुळेच केजरीवाल यांच्यावर राजकीय संकट कोसळल्याचे ही ते म्हणाले.