आरक्षण आंदोलनातून पटते मराठ्यांच्या लढाऊ वृत्तीची साक्ष

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांचे प्रतिपादन

आरक्षण आंदोलनातून पटते मराठ्यांच्या  लढाऊ वृत्तीची साक्ष

शरद गोरे

अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद

जय शिवराय, 
संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे लाखो मराठा समाज बांधव त्यांना खंबीरपणे साथ देत आहेत पाऊसा सारख्या संकटाशी चार हात करून एकाद्या शूरवीरासारखे आपल्या प्राणाची बाजी लावून प्राणपणाने लढत आहेत मराठे किती चिवट व जिद्दी अन लढव्ये आहेत याची प्रचिती हे पाहिल्यावर आल्या शिवाय राहत नाही गतवैभवातील झुंजार मराठे कसे होते याची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही

सेनापती जर मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा प्रामाणिक असला की सैन्य हि सर्व संकटाच्या छातावर घट्ट पाय रोवून खंबीरपणे वादळाशी समर्थपणे कसे झुंज देऊ शकते याचा प्रत्यय ही पदोपदी येतो हे सर्व गरजवंत मराठे स्वतःच्या पैशाने सायकल ट्रक,एसटी रेल्वे तर काहीजण चक्क पायी आलेत भाड्याच्या लोकांनी सभेला गर्दी गोळा करणारे पायपोस किंमतीचे फुटकळ पुढारी कुठं अन मातीशी ईमान राखणारे मनोजदादा कुठं ? तुलना तर बरोबरींच्या लोकांशी केली जाते ज्यांचा ईमानदारीशी दूरान्वये संबंध नाही असे दीड शहाणे पुढारी हे पक्ष श्रेष्ठीची खुशामत करण्यासाठी राजकीय लाभ मिळवण्यासाठी अनैतिकतेच्या
वाटेवरून नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत समाजाच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत त्यांनी लक्षात ठेवावं जे डोक्यावर घेऊ शकतात ते पायाखाली घ्यायला कमी करणार नाही !

हे पण वाचा  गणेशोत्सव - राज्य महोत्सवा’चा शासकीय निर्णय का नाही?

मराठे मुंबईत आल्यावर त्यांना सुविधा पुरवण्या एैवजी त्यांची पूर्णपणे कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला आझाद मैदान परिसरातील सर्व हॅाटेल्स खानपानाच्या टपऱ्या ह्या सरकारच्या जुलमी हुकमाशिवाय बंद होणे हे कदापी शक्य नाही, सुलभ शौचालय हि बंद केली गेली की जेणे करून आंदोलक हतबल होऊन माघारी परत गेले पाहिजेत साधं प्यायला पाणी मिळणार नाही अशी कपटी भूमिका घेऊन जो छळ केला पण मराठ्यांनी आपल्या संयमाने या संकटाशी झुंज दिली व कोंडी करणाऱ्या नीचवृत्तीला नामोहरम केले या सर्व घटनांची जाणीव असूनसुद्धा मराठा असलेल्या किती आमदार खासदार व पुढारीने यांनी मदतीचा हात पुढे केला हा मोठा यक्ष प्रश्न आहे ? लाचार झालेल्या मराठ्यांने आपल्या राजकीय फायद्यासाठी नेत्यांचे तळवे चाटणे बंद केले पाहिजे १२० मराठा आमदार आहेत जवळपास २० मराठा खासदार आहेत यातील काही सन्माननीय अपवाद वगळता बाकी सर्व मराठा समाजाशी गद्दारी करत आहेत त्यांना वाटत असेल समाजाला काही कळत नाही या भ्रमात अजिबात राहू नये समाज आता जागा झाला आहे तो या गद्दारांचा बाजार उठवल्या शिवाय गप्प बसणार नाही ,अजूनही वेळ गेलेली नाही शहाणे व्हा अन समाजासाठी या लढायात हिरारीने आपला सक्रिय सहभाग नोंदवा व तुमच्या पक्षावर मराठा आरक्षण मिळण्यासाठी दबाव टाका वेळ प्रसंगी  आपल्या आमदारकी खासदारकी व पदाचा राजीनामा तोंडावर फेकून मारा नाहीतर तुमची नोंद खुद्दार नाही तर गद्दार म्हणून होईल हे लक्षात ठेवा !

काही कारणास्तव घरात असलेल्या 
मराठा बांधव व भगिनींनी सर्व शक्तीनिशी समाजाच्या पाठीशी राहून सर्व मदत करावी समाज माध्यमांवर समाजाच्या बाजूने सशक्तपणे बाजू मांडावी चुकीच्या माहितीस विरोध करून उघडे पाडावे काही माध्यमे जाणीवपूर्वक आंदोलनाची बदनामी करण्यासाठी सुपारी घेऊन काम करत आहेत हे फारच दुर्दैवी आहे,महाराष्ट्रात आजवर हजारो शेतकरी आत्महत्या झाल्या व आज ही होत आहेत त्या आत्महत्या करणाऱ्या 
मध्ये मराठा समाजाचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे हे वास्तव असून ही ते जाणीवपूर्वक लपवले जाते आत्महत्या झाली की फक्त शेतकरी असं सांगितलं जातं,आमच्या शेतीमालाला भाव नाही वाढती महागाई व शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे मराठा पूर्णपणे हतबल झाला आहे तरूणाईची पूर्ण पात्रता असून 
तो नोकरी पासून वंचित राहत आहे ते फक्त आरक्षण नसल्यामुळेच महाराष्ट्राचा कणा असलेला मराठा आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे हि लढाई जर तो जिंकला नाही तर मराठा इतिहास जमा व्हायला वेळ लागणार नाही आरक्षण मिळवून इतिहास घडवायचा का इतिहास जमा व्हायचे हे समाजाच्या हाती आहे,
आजवर लढलो मातीसाठी 
एक लढा फक्त जाती साठी 

डॉ.शरद गोरे 
राष्ट्रीय अध्यक्ष 
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद
9422300362

About The Author

Advertisement

Latest News

मराठा आरक्षण लढा : मनोज जरांगे यांचा विजय जाहीर, सरकारकडून सहा मागण्या मान्य मराठा आरक्षण लढा : मनोज जरांगे यांचा विजय जाहीर, सरकारकडून सहा मागण्या मान्य
मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मोठा विजय मिळवला असल्याचे...
आंदोलकांनी नाकारल्या पोलिसांच्या नोटीसा
'जरांगे नावाचे भूत उभे केले पवारांनीच'
आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या!
मराठा  आंदोलनकर्त्यांच्या सोयीसुविधांसाठी प्रभाकर देशमुखांचा पुढाकार
आरक्षण आंदोलनातून पटते मराठ्यांच्या लढाऊ वृत्तीची साक्ष
'मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा दोन समूहांना...'

Advt