- राज्य
- पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
बंगाल उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम
पुणे: प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पंजाब हरियाणा आणि दिल्ली या भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती असताना राज्यातही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगर परिसरात आज पावसाच्या हलक्या सरी पडतील तर पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर परिसर, रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग जिल्हे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.
पावसाळ्याचा एक महिना अद्याप शिल्लक असतानाच राज्यातील बहुतेक धरणे 100% भरली असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या मोसमात गोदावरी नदीला दोन वेळा पूर आला असून नांदेड शहर आणि परिसर यामुळे बाधित झाले आहे. राज्याच्या बहुतेक भागात पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. मात्र, बहुतेक पाणीसाठे भरलेले असल्यामुळे पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.