- राज्य
- आरक्षणासाठी पदवीधर बंजारा तरुणानेही घेतला गळफास
आरक्षणासाठी पदवीधर बंजारा तरुणानेही घेतला गळफास
हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण देण्याची मागणी
धाराशिव: प्रतिनिधी
हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी असलेली चिठ्ठी लिहून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पवन गोपीचंद चव्हाण (वय 32, रा. नाईक नगर, मुरूम) असे या युगाचे नाव आहे. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपे जावे यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय. सरकारने जारी केला आहे. याच जीआरप्रमाणे बंजारा समाजाला ही आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यासाठी आंदोलने सुरू आहेत.
लातूर जिल्ह्यातील जिंतूर याच मागणीसाठी झालेल्या आंदोलनात दोन दिवस सहभागी होऊन पवन आपल्या गावी परतला होता. नाईक नगर येथे आपल्या समाजातील तरुणांमध्ये या आंदोलनाबाबत माहिती देऊन तो आंदोलन स्थळी परत जाणार होता. मात्र, जिंतूर येथे परतण्यापूर्वी आपल्या घरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.
यावेळी पोलिसांनी केलेल्या मृतदेहाच्या तपासणीमध्ये त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. पवन याने बी कॉम ची पदवी घेतली असूनही तो बेरोजगार होता.