पुणे शहरात महाबोधी विहार मुक्तीसाठी बौध्द समाजाचा महामोर्चा आंदोलन!

महाबोधी विहार मुक्तीसाठी हजारोंच्या संख्येने बौध्द समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले 

पुणे शहरात महाबोधी विहार मुक्तीसाठी बौध्द समाजाचा महामोर्चा आंदोलन!

पुणे, प्रतिनिधी

बिहार राज्यातील पाटणा  बौधद गया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्ष झाले त्याठिकाणी ब्राह्मण व्यवस्थापन असून ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून  ते बौध्दांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भन्तेजींच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलने सुरु आहेत.

आज पुण्यात ही महाबोधी विहार मुक्तीसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच,बौध्द  समाज बांधवांनी मोठा मोर्चा काढून महाविहार मुक्तीसाठी आंदोलन करण्यात आले.महाबोधी विहार मुक्ती कृती समितीच्या वतीने तसेच समस्त भन्ते यांच्या नेतृत्वात आंदोलनास सुरुवात करण्यात आली  बुध्दम शरणम गच्छामी सुरात शिवाजीनगर येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकापासून आंदोलानास ,मोर्चास सुरुवात करण्यात आली. रथात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर  व तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मुर्ती ठेवून हातात पंचशील ध्वज, अंगात पांढरे वस्त्र परिधान करून महिला व पुरुष आंदोलनात हजारोंच्या संख्येने  सहभागी झाले होते.महाबोधी  विहार मुक्तीसाठी यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. हातात विविध मागण्पाचे फलक दिसत होते.

फलकावर चलो एक साथ,'चलो बुद्ध की ओर' महाबोधी  विहार मुक्त ब्राह्मण व्यवस्थेतून मुक्त झालेच पाहिजे, बौध्दांना स्वतःच्या महाबोधी  विहार व्यवस्थापन हक्क मिळताच पाहिजे, सन १९४९ चा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा रद्द  झालाच पाहिजे, बौध्दांना स्वनिर्णयाचा हक्क  मिळलाच पाहिजे, महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात दिलेच पाहिजे, आमचे महाबोधी आमचा हक्क, असे फलक हाती घेत महाबोधी विहार मुक्ती कृती समितीचे पदाधिकारी, आंबेडकरी  बौद्ध समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. महाबोधी विहार मुक्त कृती समितीचे शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, संजय सोनवणे, डाॅ.सिद्धार्थ  धेंडे, अशोक कांबळे, जयदेव गायकवाड, अविनाश साळवे, वसंत साळवे, भन्ते अनेक मान्यवर, सदस्य सहभागी झाले होते.

हे पण वाचा  पाकिस्तानमध्ये 'दीपेंद्रसिंह हुड्डा' या नावाची वाढती दहशत

मोर्चा बालगंधर्व, जंगली महाराज रस्ता , संभाजी पुतळा,ते अल्का टाॅकीज चौकापर्यंत गेला, चौकात प्रमुख नेते, भन्ते यांची भाषणे करून आंदोलनाचा शेवट करण्यात आला.

000

About The Author

Advertisement

Latest News

पाकिस्तानात हाहा:कार, कराची बेचिराख पाकिस्तानात हाहा:कार, कराची बेचिराख
नवी दिल्ली: प्रतिनिधी  काल संध्याकाळी भारताच्या विविध लष्करी तळांवर हल्ले करून पाकिस्तानने काढलेल्या कुरपतीचे अपेक्षेपेक्षा अधिक वाईट फळ पाकिस्तानला भोगावे...
इस्लामाबादसह पाकिस्तानच्या सात शहरांवर ड्रोन हल्ले
पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला
सुदर्शनचक्राने केले पाक हवाई हल्ल्यापासून भारताचे संरक्षण
लाहोरपाठोपाठ कराचीतही भर दिवसा धमाका
शुभमन गिलच्या गळ्यात पडणार कसोटी कर्णधार पदाची माला
‘सोमेश्वर फाउंडेशन’तर्फे 'पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मेपासून 

Advt