ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मालवली प्राणज्योत
मुंबई: प्रतिनिधी
ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. मागील काही दिवसापासून प्रकृती असो असल्यामुळे त्यांना कोकिलबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काल रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.
सलीम अख्तर हे हिंदी चित्रपट सृष्टीतील यशस्वी निर्माते होते. 1980 आणि 90 या दशकात त्यांनी आफताब पिक्चर्सच्या माध्यमातूनअनेक लोकप्रिय चित्रपट दिले. त्यामध्ये ‘चोरों की बारात’, ‘कयामत’, ‘लोहा’, ‘बटवारा’, ‘फूल और अंगारे’, ‘बाजी’, ‘इज्जत’ आणि ‘बादल’ यांचा समावेश आहे.
राजा की आयेगी बारात या सन 1998 मध्ये प्रसिद्ध झालेल्या चित्रपटात सलीम अख्तर यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीला प्रथम संधी दिली. त्यानंतर तिला मागे वळून पाहावे लागले नाही. त्याचप्रमाणे तमन्ना भाटिया हिला देखील त्यांनी चांद सा रोशन चेहरा या चित्रपटातून प्रथम संधी दिली.
सलीम अख्तर यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे.