विधान परिषद उपाध्यक्ष पदावर काँग्रेसचा दावा

सतेज पाटील यांची पदावर वर्णी लागण्याची शक्यता

विधान परिषद उपाध्यक्ष पदावर काँग्रेसचा दावा

मुंबई: प्रतिनिधी

अंबादास दानवे यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर रिकाम्या असलेल्या विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर संख्याबळाच्या आधारे काँग्रेसने दवा केला आहे. महाविकास आघाडीत हा दावा मान्य झाल्यास विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनते सतेज पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे

महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेताच नाही, अशी परिस्थिती प्रथमच निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, राज्यातील राजकारणाची सद्यस्थिती आणि विधानसभा, विधान परिषद विरोधी पक्षनेते पद या विषयांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार व  अमीन पटेल या नेत्यांनी मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 

या भेटीत, विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे गटाच्या सदस्याला संधी द्यावी तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावे,  अशी मागणी काँग्रेसने केली आहे. विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सर्वाधिक आठ जागा काँग्रेसच्या आहेत. सहा जागा शिवसेना ठाकरे गट आणि केवळ दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहेत. 

हे पण वाचा  भंते विनाचार्य यांची धम्मयात्रा पुण्यात: बोपोडीत जंगी स्वागत

शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीबाबत देखील या भेटीमध्ये चर्चा झाली. या विषयाबद्दल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून पक्षाचे मत व्यक्त केले जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकावे' 'फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकावे'
जालना: प्रतिनिधी  हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याबाबत बत राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयाला विरोध करणारे पत्र ज्यष्ठ मंत्री आणि ओबीसी...
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
रेल्वे पोलीस दलाच्या निरीक्षकासह तेरा शिपाई निलंबित
स्थित्यंतर by राही भिडे | अखेर हाती काय लागले!
विधान परिषद उपाध्यक्ष पदावर काँग्रेसचा दावा
लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'अपघाताने पुढारी झालेल्यांचे हे राजकारण...'

Advt