- राज्य
- खाजगी क्षेत्रातील कामाच्या वेळेमध्ये बदल
खाजगी क्षेत्रातील कामाच्या वेळेमध्ये बदल
कर्मचाऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त
मुंबई: प्रतिनिधी
अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत वाढ केली आहे. मात्र, वाढीव तासांचा वेतनापेक्षा दुप्पट मोबदला मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास प्रतिदिन ९ वरून १० पर्यंत तर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बारा तासापर्यंत वाढवण्यात आले आहेत. मात्र, आठ तासांपेक्षा अधिक कामाच्या तासांचा कर्मचाऱ्यांना दुप्पट मोबदला द्यावा, अशी अट ही सुधारणा करताना घालण्यात आली आहे.
दैनंदिन कामाचे तास वाढविण्यात आले असले तरी देखील आठवड्याला 48 तास काम आणि एक सुट्टी, हा नियम कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कामाच्या वाढीव तासांचा कर्मचाऱ्यांना अधिक मोबदला आणि अधिक सुट्ट्या घेण्यासाठी लाभ होऊ शकतो.
केंद्राच्या कृती दलानं सुचवल्यानुसार कारखाने अधिनियम 1948 मध्ये विविध सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रापूर्वी कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा या राज्यांनीसुद्धा हे बदल लागू केले आहेत.