'...या कुंकवाचा बदला मोदी सरकार कसा व केंव्हा घेणार?'
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा सवाल
सैन्याचा पराक्रम भाजप कडुन हायजॅक करण्याचा प्रयत्न निंदनीय
पुणे: प्रतिनिधी
ॲापरेशन सिंदूर’ प्रत्युत्तरात, पाकिस्तानकडून मारल्या गेलेल्या ‘८ भारतीय जवानांच्या व नागरीकांचा पत्नींच्या कुंकवाचा बदला’ मोदी सरकार कसा व केंव्हा घेणार असा असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की भारतीय सैन्याच्या विजयाचे राजकीय श्रेय घेण्यासाठी हपापलेल्या भाजपने महाराष्ट्रात तातडीने विजयी तिरंगा यात्रा काढतांना भारतीय सेनेच्या शहीद ८ जवानांपैकी ७ जवान केवळ महाराष्ट्रातील असल्याचे तरी किमान लक्षात ठेवावयास हवे होते व त्याचे गांभीर्य जोपासले पाहिजे होते.
वास्तविक येणाऱ्या महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने केवळ ‘निवडणूकाभिमुख राजकारण’ करणाऱ्या भाजपकडून भारतीय सैन्याचा पराक्रम हायजॅक करण्याचा होत असलेला प्रयत्न निंदनीय असल्याची उपरोधिक टिका देखील काँग्रेसने केली.
पहेलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी, काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला एकमुखाने पाठिंबा दिल्यावर सरकारने भारतीय सैन्यास कारवाईची पूर्ण मोकळीक व मुभा दिल्याचे देशाने पाहिले आहे. भारतीय सैन्याने देखील त्याच गतीने निर्णय घेत पाकव्याप्त जम्मू काश्मीर हद्दीतील अतिरेकी तळ उध्वस्त केले याचा निश्चितच अभिमान आहे. या कारवाईचे
देशभरात काँग्रेससह विविध पक्षांनी व जनतेने भारतीय सेनेचे अभिनंदन ही केले.
या कारवाईत भारतीय सैन्याने कटाक्षाने पाकिस्तानच्या कुठल्याही नागरी वस्ती व आस्थापनांवर हल्ला केलेला नाही. तरी देखील अतिरेक्यांना पुरस्कृत करणाऱ्या व पाठींबा देणाऱ्या घातकी पाकिस्तानने मात्र ड्रोन व मिसाईलद्वारे भारताच्या पुंछ (पंजाब), राजस्थान इ सेक्टर मध्ये आपल्या निष्पाप नागरिकांना लक्ष्य करून मारले, याचा तीव्र धिक्कार व निषेध काँग्रेस पक्ष करत आहे, असे तिवारी यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या विश्वासघातकी युद्धजन्य चढाई मध्ये काही प्रार्थनास्थळे व वास्तुंचे नुकसान होऊन १४-१५ भारतीय नागरीक मारले गेले व ५०-६० जण जखमी झाल्याची नोंद देखील मिळाली. भारतीय सेनेच्या शहीद ८ जवानांपैकी ७ जवान महाराष्ट्रातील आहेत. जवानांच्या कुटुंबियांसाठी राज्य सरकार काय देणार, अशी विचारणाही तिवारी यांनी केली.
महाराष्ट्रातील शहीद जवान…!
1 सचिन यादव वनंजे - तमलूर, देगलूर, नांदेड, महाराष्ट्र
2 मुरली श्रीराम नाईक - कामराज नगर, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र
3 सुरजकुमार रामसहाय यादव - गाव: खुटेफ़ळ, तालुका: अक्कलकुवा, जिल्हा: नंदुरबार, महाराष्ट्र
4 सुनील पंडित चौधरी - गाव: माहुर, तालुका: माहुर, जिल्हा: नांदेड, महाराष्ट्र
5 सुरेशकुमार रामनाथ यादव - गाव: खुटेफ़ळ, तालुका: अक्कलकुवा, जिल्हा: नंदुरबार, महाराष्ट्र
6 सुरेश माणिकराव शिंदे - गाव: खुटेफ़ळ, तालुका: अक्कलकुव crumbling, जिल्हा: नंदुरबार, महाराष्ट्र
7 सागर गंगाराम पाटील - गाव: खुटेफ़ळ, तालुका: अक्कलकुवा, जिल्हा: नंदुरबार, महाराष्ट्र
8 झंटू अली शेख, पश्चिम बंगाल