
मुंबई / रमेश औताडे
प्राणी प्रेमींसाठी नवी मुंबई वाशी येथील सिडको प्रदर्शन सेंटर येथे २५ मे रोजी रविवारी एक 'कॅट शो' रंगणार असून विविध प्रजातीच्या हजारपेक्षा जास्त मांजर मांजरी पाहण्याची संधी मांजर प्रेमीना मिळणार असल्याची माहिती आयोजक फिलाइन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकिब पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक दर्जाच्या कॅट शोमध्ये पर्शियन, क्लासिक लाँग हेअर, एक्झॉटिक शॉर्ट हेअर, मेन कुन अशा विविध देशी-परदेशी जातीच्या मांजरी सहभागी होणार आहेत, जागतिक स्तरावरील तज्ज्ञ यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहे. क्लबने भारतीय भटक्या मांजरांना 'इंडियामाऊ' अशी ओळख मिळवून देण्यात यश मिळवले आहे. यावेळी मांजरांना दत्तक घेता येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.
मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत आणलेली मांजरे.
000
Tags:
About The Author
Related Posts
Latest News

22 Jul 2025 19:53:40
"स्वच्छता मोहिम" आणि "सत्य बाहेर काढू" अशा घोषणा करत सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या स्वतःच्या MAGA समर्थक गटाकडून (Make...