- राज्य
- '... तर तुम्हाला रस्त्यावर फिरू नाही देणार'
'... तर तुम्हाला रस्त्यावर फिरू नाही देणार'
मनोज जरांगे पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना पुन्हा इशारा
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य केल्यानंतर त्यांनी सातारा गॅझेटियरही त्वरित लागू करण्याची मागणी केली आहे. हा निर्णय न घेतल्यास तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जरांगे यांच्या आठपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची महत्त्वाची मागणी मान्य करून त्यासाठी शासन आदेश जारी करण्यात आला आहे. आता त्यांनी सातारा गॅझेटियर लागू करण्याची मागणी केली आहे.
मी सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे. हा माझा निधन आहे. कोणी कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी माझा समाज माझ्यावर विश्वास ठेवतो. इतर कोणावर नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही चांगली व्यक्ती असल्याचेही त्यांनी सांगितले.