'जो खरा हक्कदार असेल त्यालाच मिळेल आरक्षण'

छगन भुजबळ यांची समजूत काढणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा खुलासा

'जो खरा हक्कदार असेल त्यालाच मिळेल आरक्षण'

मुंबई: प्रतिनिधी 

हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या शासन आदेशामुळे इतर मागास प्रवर्गातील आरक्षणाला कोणताही धोका नाही. ओबीसींच्या ताटातले काढून मराठ्यांच्या पदरात घातले जाणार नाही. ज्याला त्याला त्यांच्या हक्काचेच दिले जाईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री छगन भुजबळ यांची समजूत काढणार असल्याचा खुलासा केला. 

ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी हैदराबाद शासन आदेशाबाबत सरकारची बाजू मान्य करून उपोषण आंदोलन मागे घेतले आहे. छगन भुजबळ मात्र अजूनही नाराज आहेत. त्यांना या आदेशाबाबत साशंकता आहे. या आदेशाबाबत अभ्यास करत असून गरज पडली तर कायदा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार न्यायालयात दाद मागू, असे भुजबळ म्हणत आहेत. 

मात्र, काही वेळा गैरसमज होतात. ते सामंजस्याने, सामोपचाराने दूर करावे लागतात. आम्ही सत्तेवर असेपर्यंत कधीही दोन समाजांना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची वेळ येऊ देणार नाही. कोणावरही अन्याय करणार नाही. संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

हे पण वाचा  भंते विनाचार्य यांची धम्मयात्रा पुण्यात: बोपोडीत जंगी स्वागत

हैदराबाद गॅझेटियरचा शासन आदेश केवळ पुराव्यापुरता मर्यादित आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावीच लागणार आहे. त्यात कोणालाही खोटेपणा करण्यास वाव नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण काढून मराठ्यांना त्यात घुसवणार असल्याच्या आरोपात तथ्य नाही. आपण कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. 

About The Author

Advertisement

Latest News

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य
मुंबई: प्रतिनिधी  मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचे...
छगन भुजबळ हे भाजपचे प्यादे: संजय राऊत
'हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घाईने आणि दबावाखाली'
'... तर दोन समाजांमध्ये लागतील भांडणे'
मोठ्या स्फोटकांसह पाकिस्तानी दहशतवादी भारतात
केवळ परिस्थिती चिघळू नये म्हणून...
'अजित पवार यांना नाही सत्तेत राहण्याचा अधिकार'

Advt