- राज्य
- ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नाही: अतुल सावे
ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नाही: अतुल सावे
ओबीसी नेत्यांनी सोडले उपोषण
नागपूर: प्रतिनिधी
ओबीसी आरक्षण सुरक्षित रहावे यासाठी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले उपोषण सोडण्यात आले असून इतर ठिकाणी सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचे आश्वासन आंदोलकांना दिले आहे.
ओबीसी नेत्यांना समजावण्याची जबाबदारी देऊन त्यांना आंदोलनस्थळी पाठविण्यात आले. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी जारी केलेल्या शासन आदेशामुळे इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. नियमात बसणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी ग्वाही त्यांनी आंदोलकांना दिली.
दुसरीकडे खुद्द ज्येष्ठ मंत्री असलेले छगन भुजबळ हे मात्र या जीआरबद्दल साशंक आहेत. आम्ही या शासन आदेशाचा अभ्यास करत आहोत. कायदेतज्ञ मंडळींचा सल्ला घेत आहोत. वेळ पडली तर गणेशोत्सवानंतर सोमवार किंवा मंगळवारी या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेऊ, असे भुजबळ म्हणाले.