- अन्य
- पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यपदी समीर सय्यद
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यपदी समीर सय्यद
पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक (२०२५-२०२६) निवडणुकीत ‘नवभारत’चे समीर सय्यद यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. ब्रिजमोहन पाटील (सकाळ)यांची अध्यक्षपदी निवड झाली असून मंगेश फल्ले (दिव्यमराठी) हे सरचिटणीसपदी, आणि दिलीप तायडे (केसरी) हे खजिनदार म्हणून निवडून आले आहेत.
उपाध्यक्षपदी राजा गायकवाड (महाराष्ट्र टाइम्स), सागर आव्हाड (साम टीव्ही) हे विजयी झाले आहेत. तर चिटणीस : चौधरी निलेश (पुण्यनगरी) आणि तनिष्का डोंगरे (सकाळ) बिनविरोध विजयी झाले. कार्यकारिणी सदस्यपदी लक्ष्मण खोत (दै. भास्कर), राजाराम पवार (सामना), दत्तात्रय आढाळगे (सामना), अतुल चिंचली (लोकमत),नरेंद्र साठे (सकाळ), आशिष देशमुख (पुढारी), समीर सय्यद (नवभारत), विक्रांत कुलकर्णी (केसरी), तेजस टवलारकर (महाराष्ट्र टाइम्स) आणि सय्यद सज्जाद (ई टीव्ही भारत) हे विजयी झाली आहेत. निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी, तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. स्वप्नील जोशी यांनी काम पाहिले.
000