- अन्य
- शाहु महाराजांचे विचार प्रेरणादायी - संभाजी घाडगे
शाहु महाराजांचे विचार प्रेरणादायी - संभाजी घाडगे
माढ्यात शाहु महाराज जन्मोत्सव साजरा-यशस्वी उद्योजकता पुरस्कार प्रदान
On
प्रतिनिधी, माढा
आरक्षणाचे जनक असलेले छत्रपती राजर्षी महारांजानी अठरा पगड जातीच्या गोरगरीब जनतेसाठी आधारवड होते. त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी होते.सोशल मिडीयाच्या जाळ्यापासून थोडसं अलिप्त होऊन शाहु महाराजांचे चरित्र प्रत्येकांनी अभ्यासावे असे मत मराठा उद्योग कक्षाचे व्याख्याते संभाजी घाडगे यांनी मांडले.
माढ्यात सह्याद्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राजर्षी शाहु महाराजांचा जन्मोत्सव साजरा झाला.यावेळी श्री .घाडगे बोलत होते.प्रारंभी शाहु महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी औंदुबर पवार यांनी जिजाऊ वंदना गायन केली.मंचावर रोटरी क्लबचे उप प्रांतपाल डाॅ.सुभाष पाटील,डाॅ.कुमार गायकवाड, सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी शिंदे आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने शुन्यातुन विश्व निर्माण करुन जिद्द चिकाटीच्या बळावर व्यवसाय क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या बाळासाहेब गडदे यांना उद्योजकता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.संस्थाध्यक्ष दत्ताजी शिंदेनी संस्थेच्या माध्यमातुन राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहीती मांडली.डाॅ सुभाष पाटील, डाॅ.कुमार गायकवाड यांनी शाहु महाराजांविषयी विचार मांडून सह्याद्री संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शारदा शिंदे,धनश्री शिंदे,पिंकुताई मस्के, मिनाक्षी गुंड, देविदास कन्हेरे, प्रा.हरिदास इंगळे, नवनाथ विभुते, जयदीप शिंदे आदी उपस्थित होते. सुहास चवरे, श्रीकांत काशिद यांनी सुत्रसंचलन तर संदीप शिंदेनी आभार मानले.
000
Tags:
About The Author
Related Posts
Latest News
19 Jul 2025 14:57:04
मुंबई: प्रतिनिधी
अभिनेता शाहरुख खान चित्रपटातील ॲक्शन सीन चित्रीत करताना जखमी झाला असून तो पुढील उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाला आहे....