- देश-विदेश
- 'मोदी यांना निवृत्त करून गडकरी यांना पंतप्रधानपद द्या'
'मोदी यांना निवृत्त करून गडकरी यांना पंतप्रधानपद द्या'
शेतकऱ्यांसाठी कार्य करणारे किशोर तिवारी यांचे सरसंघचालकांना पत्र
यवतमाळ: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकारणातील वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने त्यांना निवृत्त करावे आणि कार्यक्षम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधानपद देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसाठी दीर्घकाळ कार्य करणारे किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सन 2012 मध्ये काही कारस्थानी मंडळींनी गडकरी यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करून सन 2014 मध्ये त्यांच्या हक्काचे पंतप्रधानपद हिरावून घेतले. पक्ष शिस्तीचे कट्टर पालनकर्ते असल्यामुळे आणि कमालीचे संयमी असल्यामुळे गडकरी हे त्या काळात गप्प बसले.
गडकरी यांच्या विरोधातील या कटात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप देखील तिवारी यांनी केला. हे दोघेही आता हयात असून ते सत्य देशासमोर आणतील आणि गडकरी यांची माफी मागतील, अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली.
गडकरी यांची देशभरात कार्यक्रम मंत्री म्हणून लोकप्रियता आहे. सर्वच पक्षात त्यांना मान्यता आहे. त्यामुळे सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर देशाची प्रगती साधण्यासाठी गडकरी यांचे नेतृत्व प्रस्थापित करावे आणि त्यांना पंतप्रधानपद द्यावी, अशी आपल्याला विनंती असल्याचे तिवारी यांनी सरसंघचालकांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.