जर्मन परराष्ट्र मंत्र्यांनी केले भारतीय यूपीआय क्रांतीचे कौतुक

भारतापासून प्रेरणा घेऊन जर्मनीने मोठी मजल गाठल्याचे विधान

जर्मन परराष्ट्र मंत्र्यांनी केले भारतीय यूपीआय क्रांतीचे कौतुक

बर्लिन: वृत्तसंस्था

भारतात यूपीआय पेमेंट चा वापर करून लोक रस्त्यावर कांदे बटाटे आणि छोट्या मोठ्या दुकानात किराणामालही खरेदी करतात. ही बाब अचंबित करणारी आहे. जर्मनी या क्षेत्रात फार मोठा आवाका गाठू शकेल, अशी शक्यता वाटत नव्हती. मात्र, भारतापासून प्रेरणा घेऊनच जर्मनीने या क्षेत्रात मोठी मजल मारली आहे, असे प्रतिपादन जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ऍनालेना बेअरबॉक यांनी केले. 

येथे आयोजित करण्यात आलेल्या ॲन्युअल अँबेसेडर कॉन्फरन्स अर्थात राजदूतांच्या वार्षिक संमेलनात भारताचे परराष्ट्र मत्री एस जयशंकर यांच्या उपस्थितीत बेअरबॉक बोलत होत्या. 

दोन भारतात राजदूत असताना यूपीआयच्या मदतीने लोकांना रस्त्यावर छोट्या-मोठ्या वस्तूंची खरेदी करताना आपण पाहिले आहे. दिल्लीच्या मेट्रो मधून आपण प्रवास केला असून प्रत्येक किलोमीटरवर भारतात होत असलेल्या आधुनिकीकरणाचा अनुभव घेतला आहे. यूपीआय पेमेंट यंत्रणा जर्मनीत एवढ्या प्रभावीपणे वापरता येईल, याबद्दल सुरुवातीला खात्री वाटत नव्हती. मात्र, भारतीय यूपीआय पेमेंट यंत्रणेचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच जर्मनीने या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, असेही बेअरबॉक यांनी नमूद केले. 

हे पण वाचा  इस्रायल आणि इराणच्या संघर्षात चीनची उडी

डिजिटायझेशनद्वारे गल्लीबोळात आणि रस्त्या रस्त्यांवर पैशांचे लहान मोठे व्यवहार केले जाऊ शकतात हे आपण भारतात बघितले आहे. मात्र, दुसरीकडे आमच्या दूतावासात व्हिसासाठी आलेले अर्ज आम्ही आजही खोक्यात भरून गोळा करत आहोत. डिजिटल पेमेंट एवढा मोठा बदल मी करू शकेन की नाही, हे सांगता येणार नाही. मात्र, माझ्याकडे जबाबदारी असलेल्या परराष्ट्र विभागात अधिकाधिक डिजिटायझेशनचा अवलंब करून प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू, असेही त्या म्हणाल्या. 

About The Author

Advertisement

Latest News

दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
मेढा : पाचगणी पोलिस स्टेशनचे कार्यक्षम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाचगणी पोलिसांनी दाखल गुन्ह्यांमधील...
उपमुख्यमंत्र्याच्या गावकडे जाणारा तापोळा रस्ता गेला वाहून
६५ वर्षांच्या आजींचा रिक्षावर आत्मनिर्भरतेचा प्रवास!
अर्जुन कोळी यांची मिपा औरंगाबादच्या कोअर कमेटी सदस्यपदी निवड
‘टिळक’मध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना मोफत एस.टी. पासचे वितरण
खाजगी शाळेत प्रवेश घेऊन घरपट्टी, पाणी पट्टीची रक्कम मिळवा
डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advt