'फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकावे'

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी

'फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकावे'

जालना: प्रतिनिधी 

हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याबाबत बत राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयाला विरोध करणारे पत्र ज्यष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. त्याबद्दल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस यांनी भुजबळ यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी ही त्यांनी केली.

मराठा समाजाला मुलगी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची ओबीसी नेत्यांची भावना झाल्याने ते आक्रमक झाले आहेत. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचे निर्देश दिल्यामुळे नाराज असलेल्या भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या शासन आदेशाबद्दल नाराजी व्यक्त केली. 

... याचा अर्थ हा निर्णय प्रभावी व मराठ्यांच्या हिताचा

हे पण वाचा  मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य

राज्य सरकारच्या या शासन निर्णयामुळे ज्या अर्थी ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात आणि न्यायालयात दाद मागतात, त्याअर्थी, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा, मराठा समाजासाठी सकारात्मक आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट होत आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. आरक्षणाच्या बाबतीत राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना काही कळत नाही आणि तुम्हालाच सगळे कळते, अशी यांची समजूत आहे का, असा सवाल जरांगे यांनी भुजबळ यांना उद्देशून केला. 

राज्य सरकारने हेराफेरी केली तर...

छगन भुजबळ आणि अन्य ओबीसी नेत्यांच्या मागणी आणि आग्रहावरून राज्य सरकारने आपल्या निर्णयात काही फेरफार केला, सरकारमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा ही जरांगे पाटील यांनी दिला. हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मराठा समाजाला त्वरित कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली नाही तर सरकारने काही विपरीत घडल्यास आम्हाला जात विचारू नये, असा इशारा ही जरांगे पाटील यांनी दिला. 

 

About The Author

Advertisement

Latest News

वडगाव मावळ गोळीबाराने हादरले; भांडणाच्या वादातून झाली फायरिंग वडगाव मावळ गोळीबाराने हादरले; भांडणाच्या वादातून झाली फायरिंग
वडगाव मावळ/ प्रतिनिधी वडगाव मावळ केशवनगर परिसरात  झालेल्या वादातून एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि ८ सायंकाळी ७ वाजण्याच्या...
'फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकावे'
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
रेल्वे पोलीस दलाच्या निरीक्षकासह तेरा शिपाई निलंबित
स्थित्यंतर by राही भिडे | अखेर हाती काय लागले!
विधान परिषद उपाध्यक्ष पदावर काँग्रेसचा दावा
लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advt