'उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत होणार चमत्कार'

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दावा

'उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत होणार चमत्कार'

मुंबई: प्रतिनिधी 

लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपल्याला पक्षनिरपेक्ष उपराष्ट्रपतींची आवश्यकता आहे. हिंदी आघाडीचे सर्व पक्ष एकत्रित येऊन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत अचानक राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने देशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जबरदस्तीने धनखड यांचा राजीनामा घेतल्याचा आरोप केला गेला तर धनखड यांनी पक्षविरोधी कट कारस्थाने करून विरोधकांना साथ दिल्याचाही आरोप झाला. 

या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीत इंडी आघाडीने माझी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. इंडी आघाडी ही निवडणूक एकजुटीने आणि एकदिलाने लढवत आहे. सर्व विरोधी पक्षांचे पक्षप्रमुख आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिंकण्यासाठी पूर्ण तयारी करूनच ही निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचा उमेदवार विजयी होईल. देशातील लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी ते आवश्यक आहे, असेही ठाकरे म्हणाले. 

हे पण वाचा  'आंदोलनस्थळी झालेला युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे'

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला. राज्यातील उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह देशभरातील अनेक नेत्यांना आणि पक्षप्रमुखांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपर्क करून या निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली. मात्र, विरोधकांनी इंडी आघाडीच्या माध्यमातून आपला उमेदवार उभा केला आहे.

About The Author

Advertisement

Latest News

मराठा आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनेची तक्रार मराठा आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनेची तक्रार
मुंबई: प्रतिनिधी दक्षिण मुंबईत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे व्यापारी आणि व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून याप्रकरणी...
'यापुढे पाणीही न पिता करणार तीव्र उपोषण'
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'मंडल यात्रा' स्थगित
'मतांच्या राजकारणासाठी मविआकडून राज्याची कोंडी'
लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन
'आंदोलनस्थळी झालेला युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे'
गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी

Advt