- देश-विदेश
- टी 20 कर्णधारपदासाठी सूर्यकुमारच्या नावाला अधिक पसंती
टी 20 कर्णधारपदासाठी सूर्यकुमारच्या नावाला अधिक पसंती
दुखापती हा हार्दिक पांड्याच्या मार्गातील मोठा अडसर
बंगळुरू: वृत्तसंस्था
हिट मॅन रोहित शर्मा याने टी 20 विश्वचषक विजयानंतर क्रिकेटच्या या झटपट प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर टी 20 साठी भारतीय संघाच्या कर्णधार पदावर कोणाची निवड करायची याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळात खल सुरू आहे. त्यामध्ये सध्या सूर्यकुमार याच्या नावाला अधिक पसंती मिळत आयादव
रोहित शर्मा नंतर कर्णधार पदासाठी बीसीसीआय मध्ये सुरू असलेल्या चर्चेत हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. यापैकी एका नावाची निश्चिती करण्यासाठी बीसीसीआयने माजी कर्णधार रोहित शर्मा आणि नव्यानेच पदभार स्वीकारलेले मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडे विचारणा करण्यात आली. या दोघांनीही एकमताने सूर्यकुमारचे नाव अधिक पसंत केले आहे.
बीसीसीआयला टी 20 भारतीय संघासाठी दीर्घकाळ म्हणजेच किमान टी 20 विश्वचषक स्पर्धा 2026 पर्यंत नेतृत्व करू शकेल असा कर्णधार हवा आहे. त्यादृष्टीने सतत होणाऱ्या दुखापती ही हार्दिक पाड्याची पडती बाजू आहे. सतत दुखापतग्रस्त असल्याने त्याला अनेकदा सामन्यातून बाहेर राहावे लागते. त्यामुळे त्याला संघाचे कर्णधारपद दिले तरी तो दुखापतग्रस्त असताना संघासाठी पर्यायी करणधार तयार ठेवणे बीसीसीआयला आवश्यक आहे.
त्याचबरोबर नजीकच्या भूतकाळातील सूर्यकुमारची कर्णधार म्हणून कामगिरी देखील हार्दिक पेक्षा आकडेवारीने उजवी दिसत आहे. हार्दिक ने 16 आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी दहा सामने संघाने जिंकले असून पाच सामन्यात पराभव झाला आहे. एक सामना बरोबरीत सुटला. दुसरीकडे सूर्यकुमारने सात सामन्यात संघाचे नेतृत्व केले असून त्यापैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. अर्थात विजयाच्या स्ट्राइक रेट नुसार सूर्यकुमार हार्दिक पेक्षा सरस ठरतो. त्यामुळे भारतीय टी ट्वेंटी क्रिकेट संघाच्या कर्णधार पदासाठी सूर्यकुमारला पसंती दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.