- राज्य
- रोहिणी खडसे यांनी घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट
रोहिणी खडसे यांनी घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट
कथित रेव्ह पार्टीबाबत पतीवर दाखल गुन्ह्यांची जाणून घेतली माहिती
पुणे: प्रतिनिधी
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी सोमवारी रात्री पुणे येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबद्दल माहिती घेतली.
खराडी परिसरात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकून एकनाथ खडसे यांचे जावई खेवलकर आणि इतर सात आरोपींना अटक केली आहे. या छाप्यात पोलिसांना मद्य, हुक्का आणि अमली पदार्थ सापडले आहेत.
या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रातील वातावरण देखील तापले आहे. या प्रकरणात खेवलकर यांना जाणून बुजून अडकवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. रविवारी रात्री झालेल्या या कारवाईपूर्वीच पोलीस त्यांच्या मागावर होते, असे सांगितले जात आहे. खेवलकर यांच्या वकिलांनी देखील त्यांना मुद्दाम या प्रकरणात अडवण्यात आले असून त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.