- राज्य
- 'अजित पवार महाजातीयवादी आणि दरोडेखोर'
'अजित पवार महाजातीयवादी आणि दरोडेखोर'
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा पुन्हा हल्लाबोल
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण महाजातीयवादी म्हणणार. दरोडेखोर म्हणणार. याचा आम्हाला अजिबात पश्चाप नाही, अशा शब्दात इतर मागासवर्गीय समाजाची नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर पुन्हा आगपाखड केली आहे.
अजित पवार यांनी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नाकारले. इतर मागासवर्गीयांचे भवितव्य असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारली. शोषित वंचितांचा निधी नाकारला. स्वतःच्या आजारी साखर कारखान्याला मात्र या पावसाळी अधिवेशन पुरवणी मागण्याद्वारे तब्बल दोन हजार कोटींचा निधी मंजूर करून घेतला. अशा अजित पवारांना आम्ही काय म्हणणार, असा सवाल हाके यांनी केला.
अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. हे काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? साधुसंत आहेत का? अजित पवार हे महाराष्ट्राला लागलेली कीड आहेत. अजित पवार दिवसाढवळ्या राज्याच्या तिजोरीवर दरोडा घालणारे आहे. त्यामुळे त्यांना दरोडेखोर म्हटले पाहिजे, अशा शब्दात हाके यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.