ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते

संभाव्य युती झाल्यास करण्याच्या उपायांची सखोल चर्चा

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते

मुंबई: प्रतिनिधी 

शिक्षणात हिंदी सक्तीवरून झालेल्या वादाने एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढले तर त्याचे परिणाम काय होतील आणि त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे महायुतीच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

त्रिभाषा सूत्रानुसार पहिलीपासून हिंदीचे शिक्षण अनिवार्य करणाऱ्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे तब्बल 19 वर्षांनी एका मंचावर आले. उद्धव ठाकरे यांनी मराठी विजय सभेत, आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, अशा शब्दात संभाव्य युतीचे संकेत दिले आहेत. 

या पार्श्वभूमीवर कायमच 'इलेक्शन मोड'वर असलेला भारतीय जनता पक्ष अधिक सजग बनला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा त्याच दृष्टीने महत्त्वाचा आणि चर्चेचा ठरला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती प्रत्यक्षात उतरली तर महापालिका निवडणुकीत त्याचा महायुतीवर कितपत परिणाम होऊ शकतो, याबाबत शिंदे आणि शहा यांच्यात चर्चा झाली. महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत देखील शहा यांनी शिंदे यांना 'युक्तीच्या गोष्टी' सांगितल्याचे समजते आहे. 

हे पण वाचा  'मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचा शासन आदेश काढा'

ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीत एकत्रितपणे रिंगणात उतरल्यास त्याचा मतदानावर कितपत परिणाम होऊ शकतो, याची चाचपणी करण्यासाठी भाजपने खाजगी संस्थांकडून सर्वेक्षणही करून घेतले आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष शिंदे यांच्या कानावर घालण्यात आले आहेत. मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा भाजपचा निर्धार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंना पायबंध घालण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही केले जाणार हे निश्चित आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी
सोलापूर: प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरावर बंदी घातली आहे....
'सरकारने करायला हवा जरांगे यांच्या मागण्यांवर विचार'
अमित शहा यांच्या विमानात तांत्रिक बिघाड
वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
'मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचा शासन आदेश काढा'
अजितदादा पुणे महापालिका लढणार स्वबळावर?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

Advt