- राज्य
- चीनमधून होणारी बेदाण्याची बेकायदेशीर आयात थांबवा
चीनमधून होणारी बेदाण्याची बेकायदेशीर आयात थांबवा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे पत्र द्वारा मागणी
पुणे: प्रतिनिधी
चीनमधून महाराष्ट्रात कर चुकवून होणारी निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची बेकायदेशीर आयात त्वरित थांबवावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.
चीनमधून राज्यात वेगळयदेशीरपणे बेदाण्याची आयात केली जात आहे. त्यामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच देशाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. त्यामुळे ही आयात तरित थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी अजित पवार यांची केंद्राकडे मागणी आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून अजित पवार यांनी महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कैफियत मांडली आहे. तसेच केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांना देखील पवार यांनी पत्र दिले आहे.
राज्यातील बेदाणा हंगामात चीन मधून आयात कर चुकून निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची आयात केली जाते. त्यामुळे राज्यात तयार होणाऱ्या फेज आणि यांच्या किमती किलोमागे 100 ते 125 रुपयांनी घसरतात. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी ही बेकायदेशीर आयात थांबवावी. बेदाण्यांचा दर्जा निश्चित करण्यासाठी यंत्रणा विकसित करावी आणि कर वसुली अचूक होण्यासाठी बंदरे, विमानतळ या ठिकाणी सक्षम यंत्रणा उभारावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
पुण्यातील द्राक्ष उत्पादक संघाने अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे या समस्येकड लक्ष वेधले होते. हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले. त्यानुसार पवार यांनी केंद्राला पत्र लिहून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.