- राज्य
- मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत जाहीर;
मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत जाहीर;
तब्बल इतक्या ग्रामपंचायतीवर असणार महिलाराज
वडगाव मावळमध्ये आगामी पंचवार्षिक ग्रामपंचायतीचा सरपंच पदाच्या आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये महिलाराज अधिक असलेले दिसून आले आहे. आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड देखील झाला आहे.
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
आगामी पंचवार्षिक मावळमधील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत शुक्रवार (दि. ११ ) दुपारी 12.30 वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात काढण्यात आली. यामध्ये मावळातील 53 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार आहे.
याप्रसंगी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, मंडल अधिकारी तलाठी कर्मचारी आदीसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी विविध गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच मोठ्या संख्येने पस्थित होते .
मावळ तालुक्यात एकूण १०३ ग्रामपंचायती असून त्यांच्या सरपंचपदासाठी १३ जुन २०२५ ते १२ जुन २०३० या कालावधीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्रामधील जमातीसाठी असून, उर्वरित ग्रामपंचायतीपैकी ग्रामपंचायती बिगर अनुसूचित क्षेत्रामधील जागेसाठी आहे.
ईशान अन्सारी गणेश ढोरे इयत्ता चौथीच्या मुलाच्या हस्ते चिठ्ठया टाकून आरक्षित करण्यात आल्या. ग्रामपंचायतीबाबत आता आरक्षण स्पष्ट झाल्याने काहींची निराशा झाली असून काहींनी आनंद व्यक्त केला आहे तर इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
गावच्या सरपंच पदाचे आरक्षण
अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत आरक्षण
- अनुसूचित जमाती गावे
माळेगांव बु.सावळा,वडेश्वर,कुणे,ना.मा.,शिरदे,खांड
- अनुसूचित जमाती ( स्त्री)गावे
खांड,कुसवली,कशाळ,इंगळून,उधेवाडी,
- बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत आरक्षण
अनुसूचित (स्त्री ) गावे कान्हे ,तुंग,ओवळे,शिळींब, शिवणे
- अनुसूचित जाती
,आंबी,कुसगाव प.मा,नाणे,आढले.बु
- अनुसूचित जमाती स्त्री
जांबवडे,जांभुळ,करुंज,
- अनुसूचित जमाती
मळवडी ठुले, देवले, डोंगरगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
खडकाळा,औंढे खु,पुसाणे,
बऊर,वारु,कुरवंडे,मळवडी ढोरे,येलघोल,उर्से,शिरगाव,सोमाटणे,धामणे,मोरवे,
- नागरिकांचा मागास प्रवर्ग
भाजे,दारुंब्रे,मळवली,सांगिसे,करंजगाव,कांभरे नामा,वराळे,शिलाटणे,
वरसोली,खांडशी,सांगवडे,पाटण,
- सर्वसाधारण स्त्री
केवरे,काले टाकवे खु.,नाणोली तर्फे चाकण,ओझर्डे,कोथुर्णे,साळुंब्रे,सुदवडी दिवड,चिखलसे,गहुंजे,कल्हाट,साते,आढले,खु.डोणे,इंदुरी,डाहुली,निगडे,टाकले बु थुगाव शिवली,गोवित्री,कुसगाव खु.महागाव,घोणशेत,अजिवली
- सर्वसाधारण गावे
-कडधे,ठाकुरसाई,आंबेगाव उकसान,आढे ,मुंढावरे वाकसाई,माळवाडी ,कोंडीवडे अ.मा, बेबडओहोळ, येळसे,गोडंब्रे,भोयरे,चांदखेड,आपटी,कुसगाव बु. परंदवडी,साई,तिकोणा ताजे,कार्ला,वेहरगाव,नवलाख उंब्रे आंबळे,लोहगड पाचाणे कडधे,ठाकुरसाई,आंबेगाव उकसान,आढे ,मुंढावरे वाकसाई,माळवाडी ,कोंडीवडे अ.मा, बेबडओहोळ, येळसे,गोडंब्रे,भोयरे चांदखेड,आपटी,कुसगाव बु. परंदवडी,साई,तिकोणा ताजे,कार्ला,वेहरगाव,नवलाख उंब्रे आंबळे,लोहगड पाचाणे
About The Author
