राज्यात रोलबॉल खेळाडूंना नोकरीसाठी प्रयत्न करणार: चंद्रकांत पाटील

केनिया येथे मुलींचा रोलबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा दादांच्या हस्ते सत्कार 

राज्यात रोलबॉल खेळाडूंना नोकरीसाठी प्रयत्न करणार: चंद्रकांत पाटील

पुणे: प्रतिनिधी

अन्य खेळांप्रमाणे रोलबॉलचा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीत समावेश करण्याबरोबरच केंद्र सरकारप्रमाणेच राज्यात देखील रोलबॉल खेळाडूंना नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

केनियाची राजधानी नैरोबी येथे पार पडलेल्या 17 वर्षाखालील मुला मुलींच्या विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद जिंकलेल्या मुलींच्या संघाचार सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या खेळाचे जनक राजू दाभाडे, महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, दादासाहेब भोरे, प्रमोद काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुण्याची प्रांजल जाधव, प्राची गर्जे (अकोला), तिशा पंडित (ठाणे),
जान्हवी हेगडे (नंदुरबार), जय राजा (यवतमाळ), प्रशिक्षक हेमांगीनी काळे, तेजस्विनी यादव फिटनेस कोच, प्राची फराटे टीम सपोर्टर, मिलिंद क्षीरसागर टीम सपोर्टर यांना सन्मानित करण्यात आले.

हे पण वाचा  'भाषेवरून मारहाण करणे नाही खपवून घेतले जाणार'

रोल बॉल खेळाला भारतीय खेळ म्हणून ज्या प्रमाणे केंद्र शासनाने मान्यता दिली आहे आणि रोल बॉल खेळाडूंना नोकरीची संधी दिली आहे.  राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, या शेजारील राज्यांमध्ये तसेच जम्मू काश्मीर, तामिळनाडू, आसाम, झारखंड, केरळ या राज्यांमध्ये क्रीडा पुरस्कार, रोख पारितोषिके, नोकरीमध्ये आरक्षण देखील तेथील रोल बॉलच्या खेळाडूंना दिले आहे.  तसेच धोरण महाराष्ट्र शासनाने अंगीकारावे यासाठी आपण मदत करावी, असे आवाहन खेळाचे जनक राजू दाभाडे  यांनी केले.

रोलबॉल खेळ हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार झालेला खेळ असून याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारचे सर्व सहकार्य मिळत आहे. इतर राज्यातील खेळाडू, मार्गदर्शक, संघटक यांना त्यांच्या राज्य सरकारचे सहकार्य मिळत आहे. आपल्या राज्यातील खेळाडू राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी करून देखील या सर्व गोष्टींपासून वंचित रहात आहेत, याकडे  असे संदीप खर्डेकर यांनी निदर्शनास आणून दिले.या खेळा संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी आपल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन, पुणे यांना दिली आहे असे ही खर्डेकर म्हणाले.

चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यात 2023 साली झालेल्या विश्वचषक रोलबॉल स्पर्धेत महत्वाची भूमिका बजावली होती व तेव्हापासून दादा या खेळाडूंच्या पाठीशी उभे आहेत. त्याचप्रमाणे दादा निश्चितपणे या खेळाच्या बाबतीत राज्य सरकारकडे पाठपुरावा करतील आणि या खेळाला व खेळाडूंना प्रोत्साहन देतील, असा विश्वास संदीप खर्डेकर आणि राजू दाभाडे यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

Advertisement

Latest News

Advt