विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीचे औचित्य

विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

पुणे: प्रतिनिधी

कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे 1 ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, माजी आमदार विनायक निम्हण यांनी हयात असताना आपल्या वाढदिवसानिमित्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत होते. आता तीच परंपरा यापुढे कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गुणवंत खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ते पुढे म्हणाले की, योनेक्स सनराइज सोमेश्वर करंडक 2025 राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून 424 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा द लाईफ स्पोर्ट्स, सोमेश्वरवाडी पाषाण या ठिकाणी 1 ते 3 ऑगस्ट या कालावधीत रंगणार आहे.राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 9,11,13, 15,19 वर्षाखालील मुले व मुली, पुरुष व महिला एकेरी व दुहेरी या गटात पार पडणार आहे. याशिवाय कै. आमदार विनायक निम्हण मेमोरियल एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे. हि बुद्धिबळ स्पर्धा 8,10,12 व 15 वर्षाखालील गटात पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण एक लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असल्याचे सनी निम्हण यांनी नमूद केले.

हे पण वाचा  'जावयाला अडकवण्यासाठी पोलिसांनीच तरुणी पाठवल्या'

तसेच, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते सनी निम्हण यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा पुण्यात होत आहे. गतवर्षी देखील या ठिकाणी पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला खेळाडूंकडून भरघोस प्रतिसाद लावला होता. यावर्षी ही स्पर्धा 8 ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीत गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी रंगणार आहे.

About The Author

Advertisement

Latest News

'काँग्रेसने हिंदूंची व भारतीय जनतेची माफी मागावी' 'काँग्रेसने हिंदूंची व भारतीय जनतेची माफी मागावी'
मुंबई: प्रतिनिधी विशिष्ट समाजाची मते मिळवण्यासाठी 'भगवा दहशतवाद' अथवा 'हिंदू दहशतवाद' अशा प्रकारची मिथके पसरवणाऱ्या काँग्रेसचा मुर्खा बुरखा मालेगाव बॉम्बस्फोट...
महसूल सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे- प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले 
तपासयंत्रणांवरच न्यायालयाने उगारला कायद्याचा बडगा
'भगवा किंवा उजवा दहशतवाद अस्तित्वात नाही'
वडगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कराच्या शास्तीला अभय योजना
विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन
महादेवी हत्तीण परत आणण्याच्या मागणीसाठी जनचळवळ

Advt