- राज्य
- वडगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कराच्या शास्तीला अभय योजना
वडगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कराच्या शास्तीला अभय योजना
शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
शासनाच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार वडगाव नगरपंचायत हद्दीतील थकीत मिळकत धारकांची मालमत्ता करावरील शास्ती (दंड) अंशतः माफ करण्यासाठी अभय योजना प्रोत्साहनात्मक राबविण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे.
वडगाव शहराच्या हद्दीतील सर्व मिळकतधारकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने दि. १९ में २०२५ पर्यंतच्या मालमत्ता करावरील शास्ती (दंडात्मक व्याज) माफीसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या थकबाकीदार मिळकतधारकांची शास्ती (दंडात्मक व्याज) ची थकबाकी आहे, असे मिळकतधारकांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियम १९६५ चे कलम १५० (क) नुसार नगरपरिषद मालमत्ता करावरील शास्ती अंशतः / पूर्णतः माफ करण्यासाठी शास्ती वगळून मिळकतकराची पूर्ण रक्कम भरून विहीत नमुन्यात अर्ज नगरपंचायत कार्यालयाकडे सादर करावा.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. १५ ऑगस्ट २०२५ असेल.अभय योजना एकदाच (केवळ सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिताच) लागू आहे. अभय योजना थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी प्रोत्साहनपर आहे. जे मिळकतधारक अभय योजनेचा लाभ घेऊ इच्छितात अशा मालमत्ता धारकांनी सवलत मागणीकरता परिपूर्ण प्रस्ताव नगरपंचायत कार्यालयाकडे सादर करावा. अर्जाचा विहित नमुना नगरपंचायत कार्यालयात तसेच www.npvadgaon.in या वेबसाईटवर वर उपलब्ध आहे, त्या नमुन्यातच अर्ज सादर करावा. प्रस्ताव सादर करताना सोबत आधारकार्ड छायाप्रत, सन २०२५-२६ च्या मालमत्ता कराच्या मागणी बिलाची छायाप्रत व शास्ती वगळून संपूर्ण कराची रकम भरलेल्या पावतीची छायाप्रत जोडणे आवश्यक आहे. शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ असे आवाहन वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ प्रविण निकम यांनी केले आहे
कराचा भरणा करण्यासाठी ऑन लाईन सुविधाही उपलब्ध आहे. शास्तीची (दंडात्मक व्याजाची) रक्कम वगळून उर्वरित कराची रक्कम ONLINE पद्धतीने भरणा करावी. भरणा केल्याची पावती व website वरील विहित नमुन्यातील अर्ज भरून, SCAN करून vadgaon9@gmail.com या द्वारे मेल करावा
About The Author
