- राज्य
- मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
आरोप सिद्ध करण्यास तपास यंत्रणा असमर्थ ठरल्याचा न्यायालयाचा शेरा
मुंबई: प्रतिनिधी
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष ठरविले आहे. तपास यंत्रणांनी केलेले कोणतेही आरोप सरकारी वकील सिद्ध करू न शकल्याचा शेरा न्यायालयाने मारला आहे.
मालेगाव शहरातील मुस्लिम बहुल परिसरात रमजानच्या महिन्यात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर 101 जण जखमी झाले होते. या खटल्यात भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह, तत्कालीन लष्करी अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य नऊ जणांना आरोपी करण्यात आले.
यावेळी घडलेले मृत्यू बॉम्बस्फोटामुळे झाले हे सिद्ध करता आले नाही. घटनास्थळी लावलेल्या मोटर सायकलची मालकी साध्वी प्रज्ञा सिंह यांची असल्याचे तसेच या मोटरसायकलमध्ये आरडीएक्स स्फोटके ठेवण्यात आल्याचे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही, अशी टिप्पणी करत न्यायालयाने तब्बल सतरा वर्षानंतर या खटल्याचा निकाल देताना सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.