वाहतूक शाखा उपायुक्तांच्या गाडीला मद्यधुंद कारचालकाची धडक

मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाहतूक शाखा उपायुक्तांच्या गाडीला मद्यधुंद कारचालकाची धडक

पुणे: प्रतिनिधी 

मद्यधुंद कारचालकाने खुद्द शहराच्या वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या वाहनाला धडक दिली. 

हिम्मत जाधव हे आपले दिवसभराचे कामकाज संपवून आपल्या वाहनातून कुटुंबासह कुंभारवाड्याच्या दिशेने निघालेले असताना एका कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या कारचा चालक आणि त्याच्याबरोबर असलेला आणखी एक जण या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. 

या अपघातात हिम्मत जाधव यांच्या मुलीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा  वडगाव नगरपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

About The Author

Advertisement

Latest News

Advt