पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

मुंबई: प्रतिनिधी 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचे अर्थसहाय्य देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली जात आहे. 

या हल्ल्यात बळी पडलेले पुणेकर संतोष जगदाळे यांच्या मुलीला मुख्यमंत्र्यांचा विशेष अधिकार वापरून शासकीय नोकरी देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

हे पण वाचा  मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी

डोंबिवली येथील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी तिघे मावस भाऊ कुटुंबियांसोबत काश्मीरला फिरायला गेले होते. त्यांना दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घातल्या. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हो दोघे मित्रही त्यांच्या कुटुंबासह पहलगाम येथे गेले होते. त्यांनाही दहशतावाद्यांनी डोक्यात गोळी मारून ठार केलं. तर नवी मुंबईतील दिलीप देसले यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

About The Author

Advertisement

Latest News

दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
मेढा : पाचगणी पोलिस स्टेशनचे कार्यक्षम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाचगणी पोलिसांनी दाखल गुन्ह्यांमधील...
उपमुख्यमंत्र्याच्या गावकडे जाणारा तापोळा रस्ता गेला वाहून
६५ वर्षांच्या आजींचा रिक्षावर आत्मनिर्भरतेचा प्रवास!
अर्जुन कोळी यांची मिपा औरंगाबादच्या कोअर कमेटी सदस्यपदी निवड
‘टिळक’मध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना मोफत एस.टी. पासचे वितरण
खाजगी शाळेत प्रवेश घेऊन घरपट्टी, पाणी पट्टीची रक्कम मिळवा
डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advt