खापे वाटपानंतर चढाओढ पालकमंत्री पदासाठी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच

खापे वाटपानंतर चढाओढ पालकमंत्री पदासाठी

मुंबई: प्रतिनिधी 

खाते वाटपाबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये दीर्घकाळ खल झाल्यानंतर अखेर हिवाळी अधिवेशनाच्या अखेरीला मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. खातेवटपानंतर आता विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये चढाओढ सुरू पालक विशेषतः दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन पालकमंत्री पद आपल्याकडेच राहावी यासाठी महायुतीतील घटक पक्ष रस्सीखेच करीत आहेत. 

मुंबईच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि भाजप हे दोघेही आग्रही आहेत. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर अजित पवार यांचा अलिखित दावा असला तरी देखील लवकरच महापालिका निवडणूक होत आहे. पुणे आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे. महापालिका निवडणूक लक्षात घेता पुण्याच्या पालकमंत्री पदावर भारतीय जनता पक्ष दावा करण्याची शक्यता अधिक आहे. 

रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे हे दोघेही आग्रही आहेत. बीडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांना मिळणार की भाजपच्या पंकजा मुंडे यांना मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. संभाजीनगर च पालकमंत्री पदाची माळ संजय शिरसाट यांच्या गळ्यात पडणार की अतुल सावे यांना पद मिळणार याबाबतही उत्सुकता आहे. 

हे पण वाचा   डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर

About The Author

Advertisement

Latest News

Advt