- राज्य
- कारवाईनंतरही बागबान हॉटेलकडून GST बाबत फसवणूक
कारवाईनंतरही बागबान हॉटेलकडून GST बाबत फसवणूक
पैसे घेवुनही ग्राहकांना GST शिवायची बिले
पुणे : प्रतिनिधी
पुणे कॅम्प येथिल प्रसिद्ध बागबान रेस्टॉरंट कडून GST बाबत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी GST आयुक्तांकडे निवेदनाद्वारे रिपब्लिकन युवा मोर्चाकडून करण्यात आलेली आहे.
कोट्यावधींच्या GST चोरी प्रकरणी बागबान हॉटेलवर अधिकार्यांकडून कारवाई सुरु असताना अद्यापही सदर हॉटेलचालक ग्राहकांकडून पैसे घेवुनही GST कडे ती जमा करत नसल्याचा धक्कादायक प्रकार. समोर आल्यानंतर रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी ही तक्रार केली आहे.
हॉटेल मधून पार्सल ऑर्डर घेवुन जाताना बील भरत असताना बीलावर हॉटेलचे नाव व GST नंबर नसल्याने संशय आल्यामुळे डंबाळे यांनी याबाबत चौकशी केली असता सध्या हॉटलेवर GST कडून कारवाई करण्यात येत असल्याचे समजले. त्यामुळे कारवाई सुरु असताना पुन्हा GST चोरीची बाब गुन्हेगारी स्वरुपाच्या गुन्ह्यांची असल्याने याबाबत कारवाईसाठी तक्रार केली असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.