महसूल सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे- प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले 

मावळ तालुक्यात महसूल विभागामार्फत १ ते ७ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन

महसूल सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे- प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले 

वडगाव मावळ /प्रतिनिधी 
सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत असून विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आयोजित करण्यात येतो.  या निमित्ताने शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी  १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना सहभागी व्हावे, असे आवाहन मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले व तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले.

वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मध्ये दि १  महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे मावळ तालुक्यात महसूल विभागात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अव्वल कारकून, मंडल अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल, वाहनचालक आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

दि. २ रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी असलेल्या कुटुंबांना त्यांनी केलेले अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना अतिक्रमित जागांचे पट्टेवाटप करण्यात येणार आहे. दि. ३ रोजी तालुक्यातील पानंद व शिवरस्ते यांची मोजणी करून संबंधित रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, पानंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षलागवड करण्यात येणार आहे.

४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे अभियान राबविण्यात येणार असून, यामध्ये समाजातील सर्व घटकांना आवश्यकतेनुसार आधारकार्ड, संजय गांधी योजना ओळखपत्र, आदिवासी जात प्रमाणपत्र, जात वैधता, शैक्षणिक प्रवेशा करता आवश्यक असलेले दाखले वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत घरकुलासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देऊन जागेचा ताबा देणे याबाबत कार्यवाही केली जाणार

हे पण वाचा  विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

दि. ५ रोजी संजय गांधी योजना, कुळ कायदा, जिल्हा पुरवठा, अन्नधान्य वितरण अशा विविध विभागांच्या माध्यमातून विशेष सहय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घर भेट घेऊन डीबीटी करून घेण्यात येणार आहे.

दि. ६ रोजी शासकीय जमिनीवर असलेली अतिक्रमणे निष्कासित करणे व संबंधित जागा किंवा जमिनी अतिक्रमणमुक्त तसेच शर्तभंग असलेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार सरकार जमा करणेबाबत निर्णय घेतला जाणार

आहे. दि. ७ रोजी एम सेंड धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कृत्रिम वाळू धोरण यशस्वी करण्याच्या दृष्टीने कार्यशाळा शिबिर आयोजित करून आवश्यक प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. महसूल सप्ताह काळात राबविण्यात येणाऱ्या संबंधित सर्व कामांची प्रभावी अंमलबजावणी करून  शासनाच्या कामकाज प्रति नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होईल यावर लक्ष केंद्र नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करून सप्ताह यशव्वी करण्याचे निदर्शने त्यांनी दिले

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे आणि भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे' 'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे आणि भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे'
  संत संमेलनाची मागणी पुणे: प्रतिनिधी  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार
'काँग्रेसने हिंदूंची व भारतीय जनतेची माफी मागावी'
महसूल सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे- प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले 
तपासयंत्रणांवरच न्यायालयाने उगारला कायद्याचा बडगा
'भगवा किंवा उजवा दहशतवाद अस्तित्वात नाही'
वडगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कराच्या शास्तीला अभय योजना
विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

Advt