महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार

शिवसेना नेत्या तथा उपसभापती विधानपरिषद डॉ नीलम गोऱ्हे

महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार

पुणे: प्रतिनिधी 

पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेत्या आणि उपसभापती विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम उदघाटन नुकताच पार पडले. या कार्यक्रमाचे उपशहरप्रमुख नितीन पवार यांनी आयोजन केले होते.
    
त्यावेळी डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा महायुतीचा बालकिल्ला आहे. पण कोथरूड आणि शिवाजीनगर हे दोन मतदारसंघ तसेच पुण्यातील अनेक भाग शिवसेनेचे बालकिल्ले राहिल्याचे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. आता येत्या कालावधीत महानगरपालिकेची निवडणुक होणार आहे. त्या निवडणुका महायुतीच्या वतीने लढविल्या जाणार असल्याच्या सूचना पक्षश्रेष्ठीच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
         
आरोग्य शिबिराबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यभरात महायुती सरकाराच्या माध्यमांतून आरोग्य शिबिराचे आयोजन केले जात आहे. त्या शिबिराना नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्यातून एखाद्या नागरिकांनाला कोणत्याही आजाराचे निदान झाल्यास तात्काळ पुढील उपचार दिले जात आहे.जेणेकरून भविष्यातील आरोग्या विषयक धोके टाळणे शक्य होते.त्या दृष्टीने आज कोथरूड विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.या आरोग्य शिबिराचा लाभ प्रत्येकाने घ्यावा,या निमित्ताने मी सर्वांना एक सांगू इच्छिते की, आपल्या सर्वांच्या पाठीशी महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे.तसेच आपल्या सर्वांचे आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू द्या,असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना त्यांनी केले.

यावेळी युवासेना सचिव किरण साळी,  सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुनाईत,  शहरप्रमुख श्रद्धा शिंदे, अनिकेत जावळकर,  सुप्रिया पाटेकर, मीनल धनवटे, विराज  डाकवे,  सुनील काकडे, राजू गोखले, उदय भेलके, लखन तोंडे, शुभम कांबळे, सुनील पासलकर,  युवराज शिंगाडे, राजू विटकर, सुधीर जोशी तसेच तज्ञ् डॉक्टर्स उपस्थित होते.

About The Author

Advertisement

Latest News

'सलीम जावेद च्या कहाण्या आता बंद करा' 'सलीम जावेद च्या कहाण्या आता बंद करा'
मुंबई: प्रतिनिधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सलीम जावेद यांच्या फिल्मी कहाण्यांप्रमाणे रचलेल्या कहाण्या लोकांना सांगत आहेत. त्यात...
'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी'
'भारत काँग्रेस मुक्त करतानाच भाजप झाला काँग्रेस युक्त'
'कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या प्रयत्नातून राज्य विकासाच्या मार्गावर'
महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार
‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास
'सगळ्यांनीच प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात'

Advt