नितीन गडकरी यांना यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी केली घोषणा

नितीन गडकरी यांना यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

पुणे: प्रतिनिधी 

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार यावर्षी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी तकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. 

लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी एक ऑगस्टला अकरा वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. १९८३ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिला पुरस्कार एस.एम. जोशी यांना प्रदान करण्यात आला होता. आजवर अनेक दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, मॉटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पूनावाला आणि सुधा मूर्ती यांचा समावेश आहे.

हे पण वाचा  जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला

 

About The Author

Advertisement

Latest News

 डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर
पिंपरी: प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बहुप्रतीक्षित कार्यकारिणी बैठक बुधवार, २३ जुलै रोजी हॉटेल कुणाल, तापकीर चौक, काळेवाडी, पिंपरी...
मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर...
'लोकनाट्य कला केंद्रातील गोळीबार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न'
मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने ‘लोन आणि सबसिडी एक्स्पो-2025’ चे आयोजन
'अजित पवार यांनीच कृषी मंत्री पदाची जबाबदारी घ्यावी'
एमआयडीसी परिसरात दोन कंपन्यांना भीषण आग
'शालेय विद्यार्थी हत्या प्रकरणी अघोरी बाबाची चौकशी करा'

Advt