- राज्य
- जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला
जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला
सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना पक्षाकडून नोटीस
मुंबई: प्रतिनिधी
जनसुरक्षा विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू असताना अनुपस्थित राहिलेले काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना पक्षश्रेष्ठींनी 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. हे विधेयक विधानसभेत मांडले जात असताना त्यावर कोणती भूमिका घ्यायची हे काँग्रेसच्या सदस्यांना सांगण्यात आले नाही. त्याबद्दलची माहिती विधेयक मोठ्या बहुमताने संमत झाल्यानंतर देण्यात आली. त्यामुळे या विधेयकाबाबत काँग्रेस सदस्यांमध्ये संभ्रमाची अवस्था राहिली.
कायदा सुव्यवस्था राखणे, समाजविघातक कृत्यांना आळा घालणे आणि हिंसक अथवा भडकावणाऱ्या प्रवृत्तींना रोखणे यासाठी सक्षम कायदा आवश्यक असल्याचे सांगत सत्तारूढ पक्षांकडून जनसुरक्षा कायदा विधानसभेत मांडण्यात आला. मात्र, हा कायदा जनसरक्षेचा नसून भारतीय जनता पक्ष सुरक्षेचा असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. राजकीय विरोधकांची तोंडे बंद करण्यासाठी हा कायदा आणण्चा त्यांचा दावा आहे
प्रत्यक्षात महत्त्वाचा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने हे विधेयक सभागृहात मानले जात असताना कोणतीच भूमिका घेतली नाही. काँग्रेसचे गटनेते असलेले विजय वडेट्टीवार यावेळी सभागृहात अनुपस्थित होते. या विधेयकाबाबत कोणती भूमिका घ्यायची याची कोणतीही पूर्वकल्पना काँग्रेसच्या सदस्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे ते संभ्रमावस्थेत होते. हे विधेयक सभागृहासमोर मांडले गेले असताना केवळ कम्युनिस्ट आमदार विनोद निकाले यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांना पक्षाने बजावलेल्या नोटिशीला ते काय उत्तर देतात, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.