मावळ तालुक्यातील लाचखोर मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; २ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

महसूल विभागातील भ्रष्टाचार या प्रकरणामुळे चव्हाट्यावर ;लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

मावळ तालुक्यातील लाचखोर मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; २ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

वडगाव मावळ /प्रतिनिधी 

मावळ तालुक्यातील शिवणे येथील महसूल विभागाचे मंडल अधिकाऱ्याला २ लाख १० हजाराची लाज स्वीकारताना मंगळवारी  दि १५ रंगेहाथ पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोसरी पोलीस ठाण्यात हद्दीत ही कारवाई केली अशा गैरप्रकारांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा मावळ तालुक्यातील महसूल विभागातील भ्रष्टाचार या प्रकरणामुळे चव्हाट्यावर आला आहे.

याप्रकरणी मारुती महादेव चोरमले (५३) असे अटक केलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह खासगी व्यक्ती जयेश बाळासाहेब बारमुख (३३, चांदखेड, मावळ) यालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे.

एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी मिळून सन २०१८ व २०१९ मध्ये बांधकाम  व्यावसायिक पूर्णचंद्र सनातन स्वाईन यांना एक कोटी ९० लाख रुपये देऊन त्यांच्याकडून कुसगाव मावळ येथील ३८ गुंठे जमीन विकसन करारनामा करून घेतली आहे. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक स्वाईन यांनी तीच जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली. त्या जागेचे खरेदीखत झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयात अर्ज केला. तलाठ्याने त्या व्यक्तीचा फेरफार नोंद करून तो मंजुरीसाठी मंडल अधिकारी मारुती चोरमले याच्याकडे पाठवला.

हे पण वाचा  'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज'

संबंधित फेरफार मंजूर न होण्यासाठी तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी हरकत घेतली. त्याप्रमाणे मंडल अधिकारी चोरमले याने हरकत अर्जावर सुनावणी सुरु केली. दरम्यान, तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी तक्रारदार यांना या प्रकरणाचे अधिकारपत्र  दिले. त्यानुसार तक्रारदार हरकतीच्या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहत होते. नवीन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी तसेच ३८ गुंठे वादग्रस्त जमीन तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांच्या नावावर होण्यास मदत करण्यासाठी मंडल अधिकारी चोरमले याने तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली. तसेच त्याचा सहकारी जयेश बारमुख याला भेटण्यास सांगितले. जयेश बारमुख याने मंडल अधिकाऱ्यासाठी दोन लाख रुपये आणि स्वतःसाठी दहा हजार रुपये लाच मागितली.

तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने १४ आणि १५ जुलै रोजी सापळा लावला. १५ जुलै रोजी एमआयडीसी भोसरी मधील स्पाईन रोड येथे एका रुग्णालयाच्या समोर आरोपींनी तक्रारदार यांना बोलावले. तिथे मंडल अधिकारी चोरमले याने दोन लाख रुपये रोख स्वरूपात तर जयेश बारमुख याने १० हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून लाच घेतली. लाच घेत असताना एसीबीने दोघांना रंगेहाथ पकडले.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

सोमाटणे व वरसोली टोलनाक्यांवरील अनियमिततेबाबत आमदार शेळके यांनी सरकारला धरले धारेवर सोमाटणे व वरसोली टोलनाक्यांवरील अनियमिततेबाबत आमदार शेळके यांनी सरकारला धरले धारेवर
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  टोलनाक्यांच्या अनियमिततेवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले. जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय...
मावळ तालुक्यातील लाचखोर मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; २ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती
'माझ्याही कुंकवाला न्याय द्या'
रस्त्यांच्या दुरवस्थेवर मावळचे आमदार सुनील शेळके आक्रमक; तातडीने खड्डे बुजवण्याची सरकारकडे मागणी
'चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराज सरकारचं करायचं काय?'
समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक

Advt