बीड: प्रतिनिधी
परळी येथील वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत.
विजयी उमेदवारांमध्ये विनोद सामत, प्रकाश जोशी, डॉ. राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, महेश्वर निर्मळे, विजय वाककेर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री, रमेश कराड यांचा समावेश आहे.
बँकेच्या निवडणुकीकडे आपण राजकारण म्हणून पाहत नाही. ही सर्वसामान्य जनतेची निवडणूक होती. या निवडणुकीच्या निकालाने बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नवी सुरुवात झाली आहे. ही घोडदौड यापढेही कायम राखू, अशी ग्वाही माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली.
वैद्यनाथ बँक ही गोपीनाथ मुंडे यांची बँक म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच तिची विश्वासार्हता आहे. सर्वसामान्य नागरिक बँकेचा खातेदार आहे. त्यांच्या विश्वासामुळेच या निवडणुकीत विजयाची खात्री होती, असेही त्यांनी नमूद केले.