सारसबाग मुस्लिम नागरिकांसाठी ईदच्या दुसऱ्या दिवशी बंद?

रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप, आयुक्तांकडे कायदेशीर कारवाईची मागणी

सारसबाग मुस्लिम नागरिकांसाठी ईदच्या दुसऱ्या दिवशी बंद?

 पुणे : प्रतिनिधी 

बकरी ईदनंतरच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील सारसबाग सार्वजनिक उद्यान मुस्लिम धर्मीय नागरिकांसाठी मुद्दाम बंद ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाने केला आहे. यासंदर्भात मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देऊन उद्यान विभाग प्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

डंबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ८ जून २०२५ रोजी बकरी ईदनंतरच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजातील नागरिक उद्यानात येतील या शक्यतेवरून धार्मिक ध्रुवीकरणाच्या भूमिकेतून सारसबाग उद्यान बंद ठेवण्यात आले. ही कृती भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष मूल्यांना सुरुंग लावणारी असून सार्वजनिक ठिकाणी धार्मिक भेदभाव करून नागरिकांचा प्रवेश रोखण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

या घटनेमुळे मुस्लिम समाजात नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून, पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयाविरोधात विविध संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाने या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

हे पण वाचा  विकासाचा विश्वास वाटल्यानेच भाजप प्रवेशाचा निर्णय - सत्यजितसिंह पाटणकर

या प्रकरणावर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, उद्यान सार्वजनिक असल्याने कोणत्याही धर्माच्या नागरिकांना प्रवेश नाकारणे हा घोर अन्याय असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Vadgaon Maval मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून आढावा Vadgaon Maval मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून आढावा
वडगाव मावळ/सतिश गाडे  मावळ तालुक्यातील शासकीय यंत्रणा यांनी व लोकप्रतिनिधी  अधिकारी यांच्यात समन्वय साधावा आणि त्यातून विकासकामांना गती द्यावी, अशी...
कोरेगाव शहरातील महामार्गावर असलेल्या पुलांची कामे तात्काळ सुरू करा
खिंडवाडी ते शिवतीर्थ लाँगमार्च
शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात - जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक
Ahmedabad Aircrash | अहमदाबाद अपघाताचा पुण्यात परिणाम; दोन विमान रखडले!
घंटागाडी येत नसल्याने वाहात्या रस्त्यावर कचऱ्याचा गतिरोधक ; नागरिकाच्या सहनशिलतेचा उद्रेक!
बारामतीतील अतिक्रमण विरोधी कारवाईचा पथविक्रेत्यांकडून निषेध 

Advt