जनता अर्बन को-ऑपरेटिक बँकेच्या तज्ज्ञ संचालक पदी सी.ए. विनय लोखंडे व अॅड. विठ्ठल कदम

जनता अर्बन को-ऑपरेटिक बँकेच्या तज्ज्ञ संचालक पदी सी.ए. विनय लोखंडे व अॅड. विठ्ठल कदम

वाई : वाई येथील जनसामान्यांच्या जिव्हाळ्याची व जनतेची, जनतेसाठी, जनतेबरोबर असणारी आपली हक्काची बँक म्हणून जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., वाई यशस्वी वाटचाल करीत आहे.

बँकेचे ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक हे नेहमीच बँकेच्या पारदर्शक कारभार व तत्पर सेवेसाठी कौतुक करीत असतात. बँकेने वेगवेगळ्या क्षेत्रातील विशेषतः समाजाभिमुख सेवा कार्य करणा-या उच्चशिक्षित व तज्ज्ञ व्यक्तींना बँकेचे संचालक मंडळावर संधी देऊन त्यांचे मार्गदर्शनानुसार बँक प्रगती पथावर लेली आहे. नुकतीच बँकेचे संचालक मंडळावर तज्ज्ञ संचालक म्हणून सी. ए. श्री. विनय अरविंद लोखंडे, रा. भुईंज ता.वाई व अॅड. श्री. विठ्ठल सखाराम कदम रा. वयगाव ता. वाई यांची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करणेत आली. सी. ए. श्री. विनय लोखंडे हे गेली ५ वर्ष सीए म्हणून प्रॅक्टीस करीत असून आर्थिक क्षेत्रात कार्यरत आहेत. याअगोदार त्यांचे आजोबा कै. रामचंद्र नाना लोखंडे हे बँकेचे माजी संचालक होते. तर अॅड. श्री. विठ्ठल कदम हे वाई कोर्टामध्ये कार्यरत असून एक निष्णात वकील म्हणून ते सर्वांना ज्ञात आहेत. सध्या ते ओबीसी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. दोघेही समाजात नावाजलेल्या व्यक्ती आहेत. बँकेचे जुने दोन तज्ज्ञ संचालक सीए. मा. श्री. चेतन कोदे व मा. श्री. मदन शिंदे (निवृत्त बँकर) यांचे जागेवर या दोन्ही नवनिर्वाचित तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती केलेली आहे.

नवनिर्वाचित दोन्ही तज्ज्ञ संचालकांचे बँकेचे अध्यक्ष बळीराम जगताप, संस्थापक-संचालक सुरेशराव कोरडे (दादा), संचालक-  जगन्नाथ कदम, निळकंठ मोरे, संचालिका सौ.सुनंदा फरांदे व बँकेच्या CEO सौ. रूपाली बुलुंगे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याबाबत बोलताना सीए श्री.लोखंडे यांनी मी संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीस कटिबद्ध असून माझ्या आर्थिक क्षेत्रातील अनुभावाचा पूर्ण उपयोग बँकेचे व्यवसाय वाढीसाठी करेन असे संबोधित केले. तर अॅड. श्री. कदम यांनी बँकेच्या सर्व कायदेशीरबाबी योग्यरीत्या व वेळचेवेळी होणेसाठी मी सदैव तत्पर असेन असे सांगितले.

यावेळी बँकेचे मा.संस्थापक-संचालक श्री. सुरेशराव कोरडे यांनी बँकेच्या वेगवेगळ्या योजना सांगून त्यामध्ये बँकेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम असून बँकेवरील सर्व निर्बंधामधून (SAF) बँक बाहेर आलेली आहे. त्यामुळे बँकेचे ठेवीचे व्याजदर वाढलेले असून त्यामध्ये ४४४ दिवसांसाठी ज्येष्ठ नागारिक व्याजदर ८.५०% तर सुपर सिनिअर सिटिझन यांना ८.६०% करणेत आलेला असून त्याचा फायदा ग्राहकांनी करून घ्यावा असे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार बँकेचे संचालक निळकंठ मोरे यांनी मानले.

हे पण वाचा  किती पक्ष बदलले ते पहा

000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..! आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..!
सोलापूर - फुग्यांनी सजविलेल्या स्वागत कमानी…! बाळाचे पाय कलर मध्ये बुडवून पायाचे ठसे घेणेत दंग असलेल्या शिक्षिका…! शाळेत पहिले पाऊल...
गुलाब पुष्प आणि रेवडी देऊन महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत
नैसर्गिक ओढे नाले बुजवल्यामुळे केसनंद मध्ये घराघरात पाणी घुसले....
डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडतर्फे श्रुती अगरवाल यांची पूर्णवेळ संचालकपदावर पदोन्नती
डायलसिस उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात
जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त जनजागृती 
शेतकऱ्यांच्या थकबाकी बिलासाठी पुन्हा उपोषण

Advt