उपमुख्यमंत्र्याच्या गावकडे जाणारा तापोळा रस्ता गेला वाहून

उपमुख्यमंत्र्याच्या गावकडे जाणारा  तापोळा रस्ता गेला वाहून

ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याने पहिल्याच पावसात रस्त्याची झाली दुरावस्था
मेढा : गेली दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यात अति पर्जन्यवृष्टी होत असून पहिल्याच पावसात तापोळा-महाबळेश्वर हा मुख्यरस्ता वाहून गेला असल्याने ठेकेदाराने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे स्पष्ट होत आहे.रस्ता वाहून गेल्याने  या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्रच पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे. महाबळेश्वर तालुक्यात  मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने ओढे-नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत तापोळा विभागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला राज्यमार्ग महाबळेश्वर-तापोळा हा गुरुवारी वाहून गेला आहे. तर अनेक ठिकाणी या रस्त्यावर दरडी कोसळल्याने बांधकाम विभागाकडून कोसळलेल्या दरडी दूर करण्याचे काम सुरू आहे .

mahabaleshwar tapola road1

या रस्त्याचे नव्यानेच अंदाजे अडीच कोटी रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याने एका ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. व वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी तापोळा विभागातील जनतेतून  होत आहे.

संबंधित ठेकेदारावर बांधकाम उपअभियंता मेहरबान 
जवळपास अंदाजे अडीच कोटी रुपये निधी या रस्त्यासाठी बांधकाम विभागाने मंजूर केला आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या गावाकडे जाणारा हा मुख्यरस्ता असून या रस्त्यासाठी विशेष बाब म्हणून हा निधी देण्यात आला होता.मात्र ठेकेदार व बांधकाम उपअभियंता महाबळेश्वर यांच्या मिलीभगत मुळे ठेकेदाराने या रस्त्याचे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे केले आहे.अनेकदा याबाबत बांधकाम उपभियंता यांचेकडे सूचना नोंदवूनही बांधकाम विभागाने ठेकेदारास पाठीशी घालण्याचाच  प्रयत्न केला आहे.त्यामुळे किमान आता तरी कार्यकारी अभियंता यांनी सदर रस्त्याची क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी करावी अशी देखील मागणी जनतेतून होत आहे.

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt