‘टिळक’मध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना मोफत एस.टी. पासचे वितरण

‘टिळक’मध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना मोफत एस.टी. पासचे वितरण

कराड : शिक्षण मंडळ, कराड संचालित टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी अहिल्याबाई होळकर मोफत एस.टी. पास योजनेनुसार सर्व विद्यार्थिनींना एस.टी. पासचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी देसाई, उपप्राचार्य अरुण कोडोली, पर्यवेक्षिका भाग्यश्री देशमाने, कराड एस. टी. आगाराचे व्यवस्थापक विक्रम हांडे, स्थानक प्रमुख सागर पांढरपट्टे, वाहतूक निरीक्षक वैभव साळुंखे, अनिल सावंत, वाहतूक निरीक्षक विनोद संकपाळ, मानसी जोशी, वैशाली जाधव, सर्व शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते.

कोल्हापूर विभागात उच्च गुणवत्ताधारक कनिष्ठ महाविद्यालय म्हणून टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा नावलौकिक आहे. कराड, ढेबेवाडी, वाळवा, खटाव व कडेगाव या ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थिनी या महाविद्यालयात प्रवेश घेतात. सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी या शासकीय योजनेनुसार मोफत एस. टी. पास दिला जातो.

0000000000000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt